Home /News /sport /

IPL 2022 : 20 लाखांच्या खेळाडूपासून विराटला राहावं लागणार सावधान! RCB साठी ठरणार डोकेदुखी

IPL 2022 : 20 लाखांच्या खेळाडूपासून विराटला राहावं लागणार सावधान! RCB साठी ठरणार डोकेदुखी

गुजरात टायटन्स विरूद्ध यापूर्वी झालेल्या लढतीमध्ये आरसीबीचा पराभव झाला असला तरी त्यामध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) अर्धशतक झळकावलं होतं.

    मुंबई, 4 मे : आयपीएल स्पर्धेची दमदार सुरूवात करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) वाटचालीला ब्रेक लागला आहे. आरसीबीनं मागील तीन सामने सलग गमावले आहेत. त्यामुळे टॉप 4 मध्ये असलेली त्यांची टीम सध्या सहाव्या क्रमांकावर घसरली आहे. पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या आरसीबीची आज (बुधवार) लढत चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध (RCB vs CSK) होत आहे. या लढतीमध्ये आरसीबीनं विजय मिळवल्यास ते थेट चार नंबरवर झेप घेऊ शकतात. गुजरात टायटन्स विरूद्ध यापूर्वी झालेल्या लढतीमध्ये आरसीबीचा पराभव झाला असला तरी त्यामध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) अर्धशतक झळकावलं होतं. विराटचं या आयपीएल सिझनमधील पहिलंच अर्धशतक आहे. आता सीएसके विरूद्धही विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आरसीबीच्या फॅन्सना आहे. विराटला मोठी खेळी करण्यासाठी सीएसकेच्या 20 लाखांच्या बॉलरचा अडथळा पार करावा लागणार आहे. मागील सिझनमध्ये सीएसकेचा नेट बॉलर असलेल्या मुकेश चौधरीला (Mukesh Choudhary) यंदा सीएसकेनं 20 लाखांना करारबद्ध केलं आहे. पुण्याच्या या डावखुऱ्या फास्ट बॉलरनं यंदा चांगलंच प्रभावित केलं आहे. विराट कोहलीला डावखुऱ्या फास्ट बॉलरचा सामना करणे हे नेहमीच जड जाते असा अनुभव आहे. या सिझनमध्ये दोन्ही टीममधील यापूर्वीच्या मॅचमध्येही मुकेशनं विराटला फक्त 1 रनवर आऊट केले होते. त्यामुळे बुधवारच्या मॅचमध्ये विराटला मुकेशपासून सावध राहावे लागणार आहे. IPL 2022 : 'करो वा मरो' लढतीपूर्वी कॅप्टन धोनीला घ्यावा लागणार मोठा निर्णय! पहिलाच आयपीएल सिझन खेळणाऱ्या मुकेशनं आरसीबी विरूद्ध विराटला आऊट केल्यानंतर मागं वळून पाहिलेलं नाही. त्यानं मुंबई इंडियन्स विरूद्ध एकाच ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि इशान किशन यांना आऊट केले होते. तसंच सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध रविवारी झालेल्या लढतीमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. मुकेशनं आत्तापर्यंत 8 मॅचमध्ये 9.33च्या इकोनॉमी रेटनं 11 विकेट्स घेतल्या आहेत. दीपक चहरच्या अनुपस्थितीमध्ये 'पॉवर प्ले' मध्ये बॉलिंग करणाऱ्या मुकेशचा विराटसह संपूर्ण आरसीबीला धोका आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Ipl 2022, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या