मुंबई, 29 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीच्या (RCB) पदरी पुन्हा एकदा निराशा आली. या हंगामातही आरसीबी ट्रॉफीच्या जवळ आली पण त्यांना विजय मिळवता आली नाही. शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 7 विकेटने पराभव केला, यामुळे आरसीबीचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) या मोसमातली कामगिरीही खराब झाली. 16 मॅचमध्ये त्याने 23 च्या सरासरीने 341 रन केले, यात तो 3 वेळा गोल्डन डकवर आऊट झाला.
आरसीबीच्या या पराभवाला बॉलिवूड अभिनेत्याने विराट कोहलीला जबाबदार धरलं आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायमच चर्चेत असलेल्या केआरकेने (KRK) विराट कोहलीवर टीका केली आहे. एवढच नाही तर त्याने विराटला संन्यास घ्यायचाही सल्ला दिला आहे.
'प्रिय विराट कोहली मी तुला शेवटच्या काही सामन्यांमध्ये न खेळण्याचा सल्ला दिला होता, पण तू माझं ऐकला नाहीस. तुझ्यामुळेच आरसीबी आयपीएल 2022 मधून बाहेर झाली. तू लवकरच क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेशील, अशी आशा करतो,' असं ट्वीट केआरकेने केलं आहे. केआरकेने केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dear @imVkohli I asked you not play last matches but you didn’t listen to me. You are the reason that today #RCB is out of #IPL2022! Hope you will announce retirement from all forms of cricket soon.
— KRK (@kamaalrkhan) May 27, 2022
'मी जेव्हा ही भविष्यवाणी केली होती, तेव्हा लोक माझ्यावर भडकले होते, आज माझी भविष्यवाणी 100 टक्के योग्य ठरली, मला माहिती होतं विराट कोहली आरसीबीसाठी अनलकी आहे,' असं आणखी एक ट्वीट केआरकेने केलं होतं.
विराटची आयपीएलमधली कामगिरी
17 (13)
52 (41)
41* (29)
12 (7)
5 (6)
48 (36)
1 (3)
12 (14)
0 (1)
0 (1)
9 (10)
58 (53)
30 (33)
0 (1)
20 (14)
73 (54)
25 (24)
7 (8)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, RCB, Virat kohli