मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : विराटला आऊट दिल्यानंतर RCB चा संताप, थर्ड अंपायरलाच शिकवला ICC चा नियम

IPL 2022 : विराटला आऊट दिल्यानंतर RCB चा संताप, थर्ड अंपायरलाच शिकवला ICC चा नियम

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs RCB) 7 विकेटने पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) दिलेल्या आऊटमुळे वाद निर्माण झाला आहे.

  • Published by:  Shreyas

पुणे, 10 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs RCB) 7 विकेटने पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) दिलेल्या आऊटमुळे वाद निर्माण झाला आहे. मैदानातल्या अंपायरने एलबीडब्ल्यू दिल्यानंतर विराटने डीआरएस घेतला, पण थर्ड अंपायरनेही विराटला आऊट दिलं, यानंतर डग आऊटमध्ये जाताना विराट चांगलाच संतापला, त्याने बॅट जोरात आपटली. यानंतर आता आरसीबीनेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आरसीबीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एलबीडब्ल्यूबाबत एमसीसीचा नियम शेयर करत, थर्ड अंपायरवर निशाणा साधला आहे.

आरसीबीने एमसीसीचा नियम 36.2.2 शेयर केला आहे, या नियमानुसार स्ट्राईक वर असलेल्या बॅटरच्या बॅट आणि पॅडला एकाच वेळी बॉल लागला तर याचा फायदा बॅटरला मिळाला पाहिजे. एमसीसीच्या या नियमानुसार विराट नॉट आऊट होता.

विराटच्या आऊट होण्याचा वाद आरसीबीची बॅटिंग सुरू असताना 19व्या ओव्हरचा आहे. डेवाल्ड ब्रेविसने टाकलेला बॉल विराटने फ्रंटफूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॉल त्याच्या पॅडला लागला, यानंतर मुंबईने अपील केलं आणि अंपायरनेही विराटला आऊट दिलं.

मैदानातल्या अंपायरचा हा निर्णय पाहून विराटने डीआरएस घेतला, कारण बॉल पहिले बॅटला लागल्याचा विराटला विश्वास होता. थर्ड अंपायरनेही वेगवेगळ्या ऍन्गलने रिप्ले बघितले आणि विराट आऊट असल्याचं सांगितलं. थर्ड अंपायरचा हा निर्णय पाहून विराट चांगलाच भडकला. आऊट झाला तेव्हा विराट अर्धशतकापासून 2 रन दूर होता.

विराट कोहली आऊट झाला तरी हा निर्णय आरसीबीला महागात पडला नाही. ग्लेन मॅक्सवेलने बॅटिंगला आल्यावर लगेचच 2 बॉलला 2 फोर मारल्या, ज्यामुळे आरसीबीचा 9 बॉल शिल्लक असतानाच विजय झाला. आरसीबीचा हा या मोसमातला लागोपाठ तिसरा विजय होता. दुसरीकडे मुंबईने यंदा त्यांचे पहिले 4 सामने गमावले आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB, Virat kohli