मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : मॅच विनरला सोडणं RCB ला महागात पडणार, ट्रॉफीचं स्वप्न पुन्हा तुटणार!

IPL 2022 : मॅच विनरला सोडणं RCB ला महागात पडणार, ट्रॉफीचं स्वप्न पुन्हा तुटणार!

आयपीएलच्या 2022च्या सिझनची चर्चा आत्तापासूनच रंगायला लागली आहे. 2022 च्या लिलावापूर्वी (IPL 2022 Mega Auction) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमने (RCB) विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) या तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 3 डिसेंबर : आयपीएलच्या 2022च्या सिझनची चर्चा आत्तापासूनच रंगायला लागली आहे. 2022 च्या लिलावापूर्वी (IPL 2022 Mega Auction) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमने (RCB) विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) या तीन खेळाडूंना पुढच्या सीझनसाठी टीममध्ये कायम ठेवलं आहे; मात्र ज्या खेळाडूची जोरदार चर्चा होती, ज्या खेळाडूवर फॅन्सचा प्रचंड विश्वास होता, त्या एका खेळाडूला मात्र टीममध्ये कायम ठेवलेलं नाही. खरं तर RCBच्या कितीतरी विजयांमध्ये या खेळाडूचा मोठा वाटा आहे; पण त्याला का कायम ठेवलं नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या खेळाडूचं नाव आहे हर्षल पटेल.

  वेगवान गोलंदाज असलेल्या हर्षल पटेलच्या (Harshal Patel) बॉलिंगने विरोधी टीमच्या अक्षरश: तोंडचं पाणी पळवलं होतं. RCB च्या बहुतेक मॅचेसमध्ये हर्षल ‘मॅचविनर’ होता. 2021मध्ये झालेल्या एकूण 15 मॅचेसमध्ये त्यानं 14.34 च्या रेटने आणि 8.14 च्या स्ट्राइक रेटने 32 विकेट्स घेतल्या होत्या. तो पर्पल कॅपचाही (Purple Cap) मानकरी ठरला होता.

  आयपीलमध्ये (IPL 2021) हर्षल पटेलनं मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) विरोधात हॅट्ट्रिक केली होती. त्यानं सोळाव्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya), कायरॉन पोलार्ड (Kiron Pollard) आणि राहुल चाहर (Rahul Chahar) या तिघांच्या सलग तीन बॉलवर विकेट्स घेतल्या होत्या.

  हर्षल पटेलनं (Harshal Patel) नुकतंच न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. रांचीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी- 20 (T-20) मॅचमध्ये त्याने 25 रन्स देऊन दोन विकेट्स घेतल्या आणि ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताबही मिळवला. त्यानंतर कोलकत्यात ईडन गार्डनमध्ये 26 रन्स देऊन दोन विकेट्स घेतल्या. तसंच 11 बॉल्समध्ये 18 रन्स काढून तो ‘गेमचेंजर अॅवॉर्ड’चाही मानकरी ठरला होता.

  इतकं चांगलं खेळूनही हर्षल पटेलवर RCB च्या टीमने विश्वास दाखवला नाही. दुसरीकडे RCB ला 2008 पासून अजूनपर्यंत एकदाही IPL ची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. अशा वेळेस मॅच विनर खेळाडूंना टीममध्ये सहभागी करून घ्यायला हवं, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच हर्षल पटेलला आरसीबी कॅंपमधून रिलीज करण्यात आलं, तेव्हा चाहत्यांनाही धक्का बसला.

  हर्षल पटेलला टीममध्ये कायम न ठेवणं ही RCB ची सगळ्यांत मोठी चूक आहे असं चाहत्यांना वाटतं. या युवा खेळाडूवर अनेक फ्रँचाइजीच्या नजरा आहेत. त्यामुळेच 2022 च्या मेगा लिलावाच्या दरम्यान हर्षल पटेलला घेणं खूप मोठं आव्हान असणार आहे. आता हर्षल पुन्हा RCBमध्ये येतो का, याची त्यामुळेच उत्सुकता आहे.

  First published:

  Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction