मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : रोहित शर्माच्या त्या वक्तव्यावर का भडकले RCB चे फॅन्स?

IPL 2022 : रोहित शर्माच्या त्या वक्तव्यावर का भडकले RCB चे फॅन्स?

IPL 2022 आता प्ले-ऑफची (IPL Play Off) रेस आणखी बिकट झाली आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्ले-ऑफच्या या रेसमधून बाहेर झालेली पहिली टीम होती, पण आता त्यांच्या हातात आरसीबीचं (RCB) भवितव्य आहे.

मुंबई, 18 मे : आयपीएल 2022 आता (IPL 2022) अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. लीग स्टेजचा शेवटचा आठवडा सुरू असल्यामुळे आता प्ले-ऑफची (IPL Play Off) रेस आणखी बिकट झाली आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्ले-ऑफच्या या रेसमधून बाहेर झालेली पहिली टीम होती, पण आता त्यांच्या हातात आरसीबीचं (RCB) भवितव्य आहे.

आयपीएलच्या या मोसमातला मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर आरसीबीचं प्ले-ऑफला पोहोचणं कठीण होईल. पण दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी रोहित शर्माने केलेल्या एका वक्तव्यामुळे आरसीबीचे चाहते नाराज झाले आहेत.

आम्ही शेवटच्या मॅचमध्ये काही नव्या खेळाडूंना संधी देऊ त्यामुळे पुढच्या मोसमासाठी तयारी सुरू करता येईल, असं रोहित हैदराबादविरुद्धच्या मॅचवेळी म्हणाला होता.

रोहित शर्माचं हेच वक्तव्य आरसीबीच्या चाहत्यांना आवडलं नाही. मुंबई इंडियन्सने त्यांची अखेरची मॅच गमवावी आणि आरसीबीचं प्ले-ऑफला पोहोचणं अशक्य व्हावं, यासाठी जाणूनबुजून हे करण्यात येत असल्याचा आरोप आरसीबीच्या चाहत्यांनी केला आहे.

रोहित शर्मावर पंजाब, बँगलोर आणि केकेआरच्या चाहत्यांची नजर आहे, पण मुंबई इंडियन्सचे चाहते यांची मजा बघत आहेत, असं वक्तव्य एका फॅनने केलं आहे.

मुंबई इंडियन्सने या मोसमात 13 पैकी 10 मॅच गमावल्या आहेत, तर फक्त 3 सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला. आयपीएल इतिहासातली मुंबईची ही सगळ्यात खराब कामगिरी आहे. दुसरीकडे आरसीबीने 13 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत. आरसीबीने जर गुजरातचा पराभव केला आणि मुंबईने दिल्लीला हरवलं तर बँगलोरला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB