मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 ची (IPL 2022) लीग स्टेज आता शेवटावर येऊन ठेपली आहे. प्ले-ऑफसाठीच्या तीन टीम निश्चित झाल्या आहेत, तर चौथी टीम कोणती असणार, याचा फैसला आज होणार आहे. प्ले-ऑफच्या चौथ्या स्थानासाठी आरसीबी (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात स्पर्धा आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यातल्या सामन्यानंतर प्ले-ऑफची चौथी टीम ठरणार आहे. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला, तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचेल, पण मुंबईचा पराभव झाला तर मात्र दिल्ली कॅपिटल्स प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरेल.
आरसीबीचं भवितव्य मुंबईच्या हातात असल्यामुळे आता त्यांचे चाहते रोहितच्या टीमला जोरदार पाठिंबा देत आहेत. एवढच नाही तर आरसीबीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून मुंबईला जोरात सपोर्ट करायला सुरूवात केली आहे.
मुंबईला पाठिंबा देण्यासाठी आरसीबीने त्यांच्या प्रोफाईल फोटोही निळ्या रंगाचा केला आहे. तसंच आज रोहित शर्माला आपला पूर्ण पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने दिली आहे.
“I am banking on Rohit to come good.” - Faf du Plessis All RCB fans are, skipper! 😁 We’re all backing Ro and Co. against DC tonight. 💙😀#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #RCB #RedTurnsBlue pic.twitter.com/thXuybDxxz
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
आरसीबीच्या टीमने मुंबई इंडियन्सना एक पत्रही लिहिलं आहे. आरसीबीची पूर्ण टीम दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तुम्हाला पाठिंबा देईल, असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.
#NewProfilePic pic.twitter.com/IqRXDRDQ0E
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
#RedTurnsBlue for today! A letter to @mipaltan from RCB. 💪🏻 We’re backing you to #PlayBold all the way. Go get ‘em, champs! 🙌🏻#WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #MIvDC pic.twitter.com/MDFYFv20lb
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
Waiting for 7:30 PM tonight like. 😉⏳ #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #MIvDC pic.twitter.com/6VJl83nLEC
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स यांनी आधीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. गुजरात आणि राजस्थान यांच्यात मंगळवारी क्वालिफायरचा पहिला सामना होईल, या मॅचमध्ये जिंकणारी टीम थेट फायनलला प्रवेश करेल. तर लखनऊची टीम एलिमिनेटरमध्ये दिल्ली किंवा आरसीबीविरुद्ध खेळेल. एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल, तर विजय मिळवलेली टीम गुजरात आणि राजस्थानमधल्या सामन्यात पराभूत झालेल्या टीमविरुद्ध खेळेल, या सामन्यात जिंकलेली टीम रविवारी फायनलसाठी मैदानात उतरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians, RCB