Home /News /sport /

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव केला आहे, याचसोबत आरसीबीचं प्ले-ऑफला (IPL Play Off) पोहोचण्याचं स्वप्न अजूनही कायम आहे.

    मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव केला आहे, याचसोबत आरसीबीचं प्ले-ऑफला (IPL Play Off) पोहोचण्याचं स्वप्न अजूनही कायम आहे. गुजरातने दिलेलं 169 रनचं आव्हान आरसीबीने 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात 115 रनची पार्टनरशीप झाली. आरसीबीकडून विराट कोहलीने 54 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली, तर डुप्लेसिस 38 बॉलमध्ये 44 रन करून आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेलने 18 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले. गुजरातकडून राशिद खानने दोन्ही विकेट घेतल्या. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर गुजरातने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 168 रन केले. हार्दिकने 47 बॉलमध्ये नाबाद 62 रनची खेळी केली. तर मिलरने 34 आणि ऋद्धीमान साहाने 31 रन केले. राशिद खान 6 बॉलमध्ये 19 रनवर नाबाद राहिला. आरसीबीकडून जॉश हेजलवूडला 2, मॅक्सवेल आणि हसरंगा यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. आरसीबीचं भवितव्य मुंबईच्या हातात गुजरातविरुद्धच्या या विजयासोबतच आरसीबीचं प्ले-ऑफचं आव्हान अजूनही कायम आहे, पण त्यांना आता मुंबई इंडियन्सवर अवलंबून राहावं लागणार आहे. शनिवारी मुंबईने दिल्लीचा पराभव केला, तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल, पण जर या सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर मात्र आरसीबीचं प्ले-ऑफ खेळण्याचं स्वप्न धुळीला मिळेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Mumbai Indians, RCB

    पुढील बातम्या