मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : जडेजाचा शॉकिंग निर्णय, CSK ची कॅप्टन्सी सोडली, धोनीकडे पुन्हा चेन्नईचं नेतृत्व

IPL 2022 : जडेजाचा शॉकिंग निर्णय, CSK ची कॅप्टन्सी सोडली, धोनीकडे पुन्हा चेन्नईचं नेतृत्व

Photo-CSK/Twitter

Photo-CSK/Twitter

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) धक्कादायक निर्णय घेतला आहे. जडेजाने सीएसकेच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) धक्कादायक निर्णय घेतला आहे. जडेजाने सीएसकेच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिला आहे. खेळावर लक्ष देण्यासाठी जडेजाने टीमचं नेतृत्व सोडण्याचं ठरवलं, तसंच त्याने धोनीने (MS Dhoni) पुन्हा एकदा कर्णधार व्हावं म्हणून विनंती केली. धोनीनेही जडेजाची ही विनंती मान्य केली आहे, त्यामुळे आता पुढच्या सामन्यापासून सीएसके पुन्हा एकदा धोनीच्याच नेतृत्वात मैदानात उतरेल.

गतविजेत्या आणि 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या सीएसकेची कामगिरी यंदाच्या मोसमात निराशाजनक झाली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये सीएसके नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईने 8 पैकी फक्त 2 मॅच जिंकल्या तर 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 26 मार्चपासून सुरूवात झाली. पहिलाच सामना केकेआर आणि सीएसके यांच्यात होता. या सामन्याच्या काही तास आधीच धोनीने सीएसकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत अनेकांना धक्का दिला होता.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Ravindra jadeja