मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : Jos Buttler चं वादळी शतक, Rajasthan Royals ची फायनलमध्ये धडक, RCB ला धक्का

IPL 2022 : Jos Buttler चं वादळी शतक, Rajasthan Royals ची फायनलमध्ये धडक, RCB ला धक्का

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या क्वालिफायर 2 मध्ये जॉस बटलरच्या (Jos Buttler) वादळी शतकच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा (Rajasthan Royals vs RCB) 7 विकेटने पराभव केला आहे.

अहमदाबाद, 27 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या क्वालिफायर 2 मध्ये जॉस बटलरच्या (Jos Buttler) वादळी शतकच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा (Rajasthan Royals vs RCB) 7 विकेटने पराभव केला आहे. याचसोबत राजस्थानने आयपीएलची फायनल (IPL Final) गाठली आहे. जॉस बटलरचं या आयपीएलमधलं हे चौथं शतक आहे. आरसीबीने दिलेलं 159 रनचं आव्हान राजस्थानने 18.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं. बटलरने (Jos Buttler) 60 बॉलमध्ये नाबाद 106 रन केले, यामध्ये 10 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. या पराभवासोबतच आरसीबीचं फायनलला पोहोचण्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आरसीबीकडून जॉश हेजलवूडला 2 आणि वानिंदु हसरंगाला 1 विकेट मिळाली.

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 157/8 वर रोखलं. आरसीबीकडून रजत पाटीदारने सर्वाधिक 58 रन केले. तर फाफ डुप्लेसिस (25) आणि ग्लेन मॅक्सवेल (24) यांना चांगली सुरूवात मिळूनही मोठा स्कोअर करता आला नाही. राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णाने 4 ओव्हरमध्ये 22 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर ओबेड मकॉयने 4 ओव्हरमध्ये 23 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. याशिवाय बोल्ट आणि अश्विन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

गुजरात-राजस्थानमध्ये फायनल

आयपीएल 2022 ची फायनल गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. रविवार 29 मे रोजी हा महामुकाबला रंगेल. राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नच्या नेतृत्वात 2008 साली झालेली पहिली फायनल जिंकली होती, तर गुजरात टायटन्सचा आयपीएलचा हा पहिलाच मोसम आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, RCB