मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : Virat Kohli खरंच बिग मॅच प्लेयर आहे का? हे आकडे सांगतात वेगळीच गोष्ट

IPL 2022 : Virat Kohli खरंच बिग मॅच प्लेयर आहे का? हे आकडे सांगतात वेगळीच गोष्ट

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) विराट कोहलीची (Virat Kohli) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. क्वालिफायर-2 च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RCB vs Rajasthan Royals) खेळताना विराट कोहली 8 बॉलमध्ये 7 रन करून आऊट झाला.

मुंबई, 27 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) विराट कोहलीची (Virat Kohli) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. क्वालिफायर-2 च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RCB vs Rajasthan Royals) खेळताना विराट कोहली 8 बॉलमध्ये 7 रन करून आऊट झाला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर बॅटिंगला आल्यानंतर विराटने खणखणीत सिक्स मारली, तेव्हा आरसीबीच्या चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या, पण लगेचच त्यांची निराशा झाली.

आयपीएलच्या या मोसमात विराटने 16 मॅचमध्ये 22.73 च्या सरासरीने आणि 115.98 च्या स्ट्राईक रेटने 341 रन केले आहेत, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 73 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.

आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून विराट कोहली आरसीबीकडून खेळत आहे. आतापर्यंत त्याने आयपीएल नॉक आऊटचे 11 सामने खेळले आहेत, यात त्याला फक्त एकदाच अर्धशतक करता आलं आहे. आयपीएल 2011 च्या फर्स्ट क्वालिफायिंग फायनलमध्ये विराटने 70 रनची खेळी केली, पण याशिवाय त्याला नॉक आऊटसारख्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठा स्कोअर करता आलेला नाही. आयपीएल नॉक आऊटच्या 11 सामन्यांमध्ये विराटने फक्त 212 रन केले.

आयपीएल नॉकआऊटमधली विराटची कामगिरी

आयपीएल 2009 सेमी फायनल- नाबाद 24 रन

आयपीएल 2010 सेमी फायनल- 9 रन

आयपीएल 2011 फर्स्ट क्वालिफायिंग फायनल - नाबाद 70 रन

आयपीएल 2011 सेकंड क्वालिफायिंग फायनल- 8 रन

आयपीएल 2015 एलिमिनेटर- 12 रन

आयपीएल 2015 सेकंड क्वालिफायर- 12 रन

आयपीएल 2016 फर्स्ट क्वालिफायर- 0 रन

आयपीएल 2020 एलिमिनेटर- 6 रन

आयपीएल 2021 एलिमिनेटर- 39 रन

आयपीएल 2022 एलिमिनेटर- 25 रन

आयपीएल 2022 क्वालिफायर 2 - 7 रन

First published:

Tags: Ipl 2022, RCB, Virat kohli