Home /News /sport /

IPL Qualifier 1 GT vs RR : गुजरात का राजस्थान, कोण गाठणार IPL Final? पांड्याने टॉस जिंकला

IPL Qualifier 1 GT vs RR : गुजरात का राजस्थान, कोण गाठणार IPL Final? पांड्याने टॉस जिंकला

आयपीएल 2022 च्या पहिल्या क्वालिफायर (IPL 2022 Qualifier 1) सामन्यात गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs Rajasthan Royals) कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

    कोलकाता, 24 मे : आयपीएल 2022 च्या पहिल्या क्वालिफायर (IPL 2022 Qualifier 1) सामन्यात गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs Rajasthan Royals) कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्या गुजरातने फक्त एक बदल केला आहे. लॉकी फर्ग्युसनऐवजी अल्झारी जोसेफ याची निवड करण्यात आली आहे. तर राजस्थान रॉयल्सने टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. लीग स्टेजच्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातची टीम पहिल्या आणि राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर राहिली. गुजरातने 14 पैकी 10 मॅच जिंकल्या तर राजस्थानला 14 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. आजच्या सामन्यात विजय मिळवणारी टीम थेट फायनलमध्ये (IPL Final) प्रवेश करणार आहे, तर पराभूत झालेल्या टीमला फायनलला पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. आयपीएल एलिमिनेटरचा सामना लखनऊ आणि आरसीबी (LSG vs RCB) यांच्यात बुधवारी होणार आहे. या सामन्यात पराभूत झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल, तर जिंकलेली टीम गुजरात किंवा राजस्थान यांच्यात पराभूत झालेल्या टीमविरुद्ध क्वालिफायर 2 चा सामना खेळेल. क्वालिफायर 2 मध्ये जिंकलेली टीम फायनलमध्ये आज विजय मिळवलेल्या टीमविरुद्ध खेळेल. 29 मे रोजी आयपीएलची फायनल खेळवली जाणार आहे. गुजरातची टीम ऋद्धीमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर साई किशोर, यश दयाळ, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी राजस्थानची टीम यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, आर.अश्विन, शिमरन हेटमायर, रियान पराग, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेड मकॉय
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या