मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 मध्ये कोरोनाचं संकट गडद, DC vs PBKS मॅचबद्दल समोर आली मोठी अपडेट

IPL 2022 मध्ये कोरोनाचं संकट गडद, DC vs PBKS मॅचबद्दल समोर आली मोठी अपडेट

DC vs PBKS

DC vs PBKS

DC vs Punjab Kings: आयपीएलच्या या मोसमातही (IPL 2022) कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. कठोर बायो-बबलमध्ये असतानाही दिल्लीच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम सध्या मुंबईच्या हॉटेलमध्येच क्वारंटाईन झाली आहे. अशातच बुधवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या मॅचसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari
मुंबई, 19 एप्रिल: आयपीएलच्या या मोसमातही (IPL 2022) कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. कठोर बायो-बबलमध्ये असतानाही दिल्लीच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम सध्या मुंबईच्या हॉटेलमध्येच क्वारंटाईन झाली आहे. अशातच बुधवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs PBKS) यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या मॅचसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. बुधवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. आता हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमऐवजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाची आणखी नवीन प्रकरणे समोर येत नसल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. IPL 2022 : आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, पाकिस्तानी कनेक्शनमुळे दिल्ली संकटात!
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याच्या ठिकाणी हा बदल दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचे पाच नवीन रुग्ण आढळल्यानंतर करण्यात आला आहे. 15 एप्रिल रोजी दिल्ली संघाचे फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. दुसऱ्या दिवशी टीमचा मसाज थेरपिस्ट चेतन कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दोन दिवसांनी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन बॅट्समन मिचेल मार्शला व्हायरसची लागण झाली. त्याच दिवशी टीममधील आणखी दोन सदस्य डॉ. अभिजित साळवी आणि सोशल मीडिया मॅनेजर आकाश माने यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. दिल्ली कॅपिटल्समधील ज्या सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे ते आयसोलेशनमध्ये आहेत आणि डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत. आता सहाव्या आणि सातव्या दिवशी त्यांची चाचणी केली जाईल आणि दोन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते दिल्ली कॅपिटल्सच्या बायो-बबलमध्ये दाखल केले जातील. 16 एप्रिलपासून दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. आता बुधवारी म्हणजेच पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी कोरोना चाचणीसाठी आरटी-पीसीआर चाचणी होईल.
First published:

Tags: Corona spread, Cricket, Delhi capitals, Ipl 2022, Punjab kings

पुढील बातम्या