Home /News /sport /

पृथ्वी शॉने मुंबईमध्ये विकत घेतलं आलिशान अपार्टमेंट, किंमत पाहून बसेल धक्का

पृथ्वी शॉने मुंबईमध्ये विकत घेतलं आलिशान अपार्टमेंट, किंमत पाहून बसेल धक्का

Prithvi Shaw

Prithvi Shaw

लहान वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) मुंबईमध्ये आलिशान घर घेतलं आहे. याआधी त्याने महागडी कारही विकत घेतली.

    मुंबई, 4 मे : पृथ्वी शॉचं (Prithvi Shaw) वय लहान होतं, उंची कमी होती, पण स्वप्न मात्र मोठी होती. हीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने कठोर मेहनत केली. फक्त चार वर्षांचा असताना पृथ्वी शॉच्या आईचं निधन झालं. यानंतर वडिलांनी त्याला लहानाचं मोठं केलं आणि क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केलं. मुलाच्या क्रिकेटसाठी वडिलांनी त्यांच्या व्यवसायही सोडला, कारण आपला मुलगा एक दिवस नाव कमवेल, असा विश्वास त्यांना होता. मुलानेही वडिलांचा हा विश्वास सार्थ ठरवला. लहान वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या पृथ्वी शॉने मुंबईमध्ये आलिशान घर घेतलं आहे. याआधी त्याने महागडी कारही विकत घेतली. प्रत्येकासाठीच स्वत:चं घर विकत घेणं हे स्वप्न असतं, पृथ्वीनेही त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं. पृथ्वी शॉने मुंबईच्या वांद्रे रेक्लमेशनमध्ये एक प्रीमियम रेसिडेन्शियल अपार्टमेंट विकत घेतलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या घराची किंमत 10.50 कोटी रुपये आहे. इंडेक्स टॅपच्या रिपोर्टनुसार पृथ्वी शॉच्या या प्रीमियम अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 2209 स्क्वेअर फीट आहे, तर एक टेरेस 1654 स्क्वेअर फुटांची आहे. या घराच्या स्टॅम्प ड्युटीसाठी त्याला 52 लाख रुपये भरावे लागले. पृथ्वी शॉने वयाच्या 18व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. राजकोटमध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या सामन्यात शॉने शतक केलं होतं, याचसोबत तो सगळ्यात लहान वयात शतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. याआधी पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारताने अंडर-19 वर्ल्ड कपही जिंकला होता. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) तो दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळत आहे. लिलावाआधी दिल्लीने पृथ्वी शॉला रिटेन केलं होतं. स्थानिक क्रिकेटमध्ये तो मुंबईकडून खेळतो.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Prithvi Shaw

    पुढील बातम्या