मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : प्रिती झिंटाने केलं नाही रिटेन, शाहरुखने 13 बॉलमध्ये ठोकले 64 रन

IPL 2022 : प्रिती झिंटाने केलं नाही रिटेन, शाहरुखने 13 बॉलमध्ये ठोकले 64 रन

आयपीएल 2022 (IPL 2022) साठी प्रिती झिंटाची (Preity Zinta) टीम पंजाब किंग्सने (Punjab Kings) तामिळनाडूचा आक्रमक बॅटर शाहरुख खानला (Shahrukh Khan) रिटेन केलं नाही. पण याच शाहरुख खानने विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) क्वार्टर फायनलमध्ये धमाकेदार बॅटिंग केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 डिसेंबर : आयपीएल 2022 (IPL 2022) साठी प्रिती झिंटाची (Preity Zinta) टीम पंजाब किंग्सने (Punjab Kings) तामिळनाडूचा आक्रमक बॅटर शाहरुख खानला (Shahrukh Khan) रिटेन केलं नाही. पण याच शाहरुख खानने विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) क्वार्टर फायनलमध्ये धमाकेदार बॅटिंग केली आहे. कर्नाटकविरुद्धच्या या सामन्यात शाहरुखने 39 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले. शाहरुखच्या या खेळीमुळे आता पंजाब किंग्स पस्तावली असेल. शाहरुखने 202 च्या स्ट्राईक रेटने रन केले, त्याच्या या खेळीत 7 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता, म्हणजेच त्याने 13 बॉलमध्ये 64 रन फक्त बाऊंड्रीच्या मदतीने केल्या.

शाहरुख कर्नाटकविरुद्धच्या या सामन्यात 40 ओव्हरनंतर बॅटिंगसाठी उतरला, पण अखेरच्या काही ओव्हरमध्ये त्याने टी-20 स्टाईल बॅटिंग केली आणि 79 रन ठोकले. शाहरुखच्या या खेळीमुळे तामिळनाडूने कर्नाटकला विजयासाठी 354 रनचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकची टीम 39 ओव्हरमध्ये 203 रनवर ऑलआऊट झाली आणि तामिळनाडूने मॅच 151 रनने जिंकली.

शाहरुखने याआधी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) फायनलमध्येही कर्नाटकच्या बॉलिंगवर आक्रमण केलं होतं. शेवटच्या बॉलवर सिक्स मारत शाहरुखने तामिळनाडूला चॅम्पियन केलं होतं. त्या सामन्यात तामिळनाडूला अखेरच्या बॉलवर विजयासाठी 5 रनची गरज होती. कर्नाटककडून अखेरची ओव्हर प्रतीक जैन टाकत होता. प्रतिकच्या अखेरच्या बॉलवर शाहरुखने स्क्वेयर लेग बाऊंड्रीच्या दिशेने सिक्स मारला, ज्यामुळे तामिळनाडूने रेकॉर्ड तिसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी जिंकली. त्या मॅचमध्ये शाहरुखने 15 बॉलमध्ये 33 रन केले होते. या खेळीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

शाहरुख खान विजय हजारे ट्रॉफीमध्येही धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. कर्नाटकविरुद्धच्या क्वार्टर फायनलमधलं त्याचं या मोसमातलं दुसरं अर्धशतक होतं. याआधी झालेल्या एका सामन्यात त्याने 35 बॉलमध्ये 66 रनची खेळी केली होती. 6 सामन्यांमध्ये त्याने 186 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 194 रन केले, यात 15 फोर आणि 16 सिक्स आहेत.

पंजाब किंग्सने आयपीएल 2021 च्या लिलावात शाहरुख खानला 5.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. शाहरुखची बेस प्राईज 20 लाख रुपये होती. शाहरुखला विकत घेण्यासाठी आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातही चढाओढ लागली होती. आयपीएल 2022 साठी पंजाबने मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांना टीममध्ये कायम ठेवलं आहे. शाहरुखचा सध्याचा फॉर्म बघता या लिलावात त्याला मोठी रक्कम मिळणार हे निश्चित मानलं जात आहे.

First published: