मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Retention : आयपीएलची सगळ्यात धक्कादायक यादी, 19 भारतीयांना बाहेरचा रस्ता, पाहा संपूर्ण लिस्ट

IPL Retention : आयपीएलची सगळ्यात धक्कादायक यादी, 19 भारतीयांना बाहेरचा रस्ता, पाहा संपूर्ण लिस्ट

IPL 2022 Retention

IPL 2022 Retention

आयपीएल 2022 साठी (IPL 2022 Players Retention) प्रत्येक टीमने त्यांचे महत्त्वाचे खेळाडू रिटेन केले आहेत, पण यामध्ये अनेक दिग्गज भारतीयांना धक्का बसला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL 2022 Players Retention) प्रत्येक टीमने त्यांचे महत्त्वाचे खेळाडू रिटेन केले आहेत, पण यामध्ये अनेक दिग्गज भारतीयांना धक्का बसला आहे. आयपीएल 2022 साठी बनवलेल्या नियमांनुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करू शकत होती. यात 3 भारतीय आणि एक परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडूंना रिटेन करता येणार होतं. या नियमांमुळे बहुतेक दिग्गजांना पुन्हा एकदा लिलावात जावं लागणार आहे.

ज्या खेळाडूंना त्यांच्या टीमनी बाहेरचा रस्ता दाखवला यांच्यातल्या बहुतेक जणांनी आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्समधल्या पांड्या बंधू आणि ईशान किशनचा, आरसीबीच्या युझवेंद्र चहल आणि या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. दिल्लीने तर श्रेयस अय्यर, शिखर धवन, आवेश खान आणि आर.अश्विन यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

चेन्नई सुपर किंग्सला यंदा चॅम्पियन बनवणाऱ्या शार्दुल ठाकूरलाही पुन्हा एकदा लिलावात जावं लागणार आहे. केकेआरनेही शुभमन गिल आणि दिनेश कार्तिक यांना डच्चू दिला आहे. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन हे दोन फास्ट बॉलर हैदराबादच्या टीमचं प्रमुख अस्त्र होते, पण त्यांनाही रिलीज करण्याचा निर्णय त्या फ्रॅन्चायजीने घेतला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तामिळनाडूला अखेरच्या बॉलवर सिक्स मारून जिंकवणाऱ्या शाहरुख खानला पंजाबने सोडून दिलं आहे.

या खेळाडूंना बसला धक्का

मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ईशान किशन

आरसीबी : युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, देवदत्त पडिक्कल

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर, शिखर धवन, आवेश खान, आर.अश्विन

सीएसके : शार्दुल ठाकूर

केकेआर : शुभमन गिल, दिनेश कार्तिक

एसआरएच : भुवनेश्वर कुमार, टी नटराजन

पंजाब : शाहरुख खान, रवी बिष्णोई

राजस्थान : जयदेव उनाडकट, राहुल तेवतिया

आयपीएल टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर झाल्यानंतर आता दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद प्रत्येकी 3-3 खेळाडूंना थेट विकत घेणार आहे. यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये आयपीएलचा मेगा ऑक्शन होणार आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction