मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : आयपीएलच्या 8 टीम कोणत्या दिग्गजांना देणार धक्का? काही तासांमध्येच होणार मोठी घोषणा!

IPL 2022 : आयपीएलच्या 8 टीम कोणत्या दिग्गजांना देणार धक्का? काही तासांमध्येच होणार मोठी घोषणा!

आयपीएल 2022 साठी सगळ्या 8 टीमनी रिटेन (IPL 2022 Players Retention) केलेल्या खेळाडूंची यादी आता अवघ्या काही तासांमध्येच घोषित होणार आहे.

आयपीएल 2022 साठी सगळ्या 8 टीमनी रिटेन (IPL 2022 Players Retention) केलेल्या खेळाडूंची यादी आता अवघ्या काही तासांमध्येच घोषित होणार आहे.

आयपीएल 2022 साठी सगळ्या 8 टीमनी रिटेन (IPL 2022 Players Retention) केलेल्या खेळाडूंची यादी आता अवघ्या काही तासांमध्येच घोषित होणार आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी सगळ्या 8 टीमनी रिटेन (IPL 2022 Players Retention) केलेल्या खेळाडूंची यादी आता अवघ्या काही तासांमध्येच घोषित होणार आहे. बीसीसीआयने सगळ्या टीमना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी देण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत दिली आहे. आयपीएलची प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकते. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडूंचा समावेश असू शकतो.

चेन्नई सुपर किंग्स

आयपीएल 2021 ची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) एमएस धोनीलाच (MS Dhoni) कर्णधार ठेवणार आहे, हे निश्चित आहे. याशिवाय ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हेदेखील पुन्हा चेन्नईकडून खेळताना दिसतील. चेन्नईच्या टीममध्ये चौथ्या खेळाडूसाठी मोईन अली (Moeen Ali) आणि सॅम करन (Sam Curran) यांच्यात स्पर्धा आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार चेन्नईची टीम मागच्या आठवड्यापर्यंत मोईन अलीसोबत बोलणी करत होती, पण मोईन अलीसोबतची बोलणी फिस्कटली तर धोनीची टीम चौथा खेळाडू म्हणून सॅम करनचा विचार करू शकते.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्लीची (Delhi Capitals) टीम ऋषभ पंत (Rishabh Pant), अक्षर पटेल (Axar Patel), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि एनरिच नॉर्किया (Anrich Nortje) यांना कायम ठेवण्याची शक्यता आहे. दिल्लीचा स्पिनर आर.अश्विन यानेही या चार खेळाडूंना रिटेन केलं जाईल, असं सांगितलं होतं. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) आयपीएलच्या दुसऱ्या टीमकडून कॅप्टन व्हायचं असल्यामुळे तो दिल्लीची टीम सोडणार असल्याचं वृत्त आहे.

मुंबई इंडियन्स

आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणारी मुंबई इंडियन्स पांड्या बंधू आणि सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) धक्का द्यायची शक्यता आहे. मागच्या दोन वर्षांपासून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) फिटनेसने सतावलं आहे, तर कृणाल पांड्याही (Krunal Pandya) फॉर्मसाठी झगडत आहे. सूर्यकुमार यादवला  लिलावातून पुन्हा विकत घेण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. मुंबई इंडियन्स रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना रिटेन करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्सची (Punjab Kings) टीम त्यांच्याकडे असलेले सगळे खेळाडू सोडून देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पंजाब किंग्सला त्यांचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला टीमसोबत ठेवायचं होतं, पण केएल राहुल पंजाबकडून खेळण्यासाठी उत्सुक नसल्याचं बोललं जातंय. एवढच नाही तर त्याची लखनऊच्या नव्या आयपीएल टीमसोबत बोलणी झाली असून त्याने तीन वर्षांचा करार केल्याचंही वृत्त आहे.

कोलकाता नाईट रायडर्स

शाहरुख खानची केकेआर (KKR) इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांना धक्का द्यायचा तयारीत आहे. केकेआर त्यांचे दोन ऑलराऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) आणि सुनिल नारायण (Sunil Narine) यांना कायम ठेवू शकते, तसंच त्यांना मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीलाही (Varun Chakravarthy) टीममध्ये कायम ठेवायचं आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांच्यापैकी कोणाला टीममध्ये कायम ठेवायचं, याबाबत टीममध्ये संभ्रम आहे.

आयपीएल टीम या खेळाडूंना करणार रिटेन?

चेन्नई : एमएस धोनी, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली/ सॅम करन

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिच नॉर्किया

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, ईशान किशन

केकेआर : सुनिल नारायण, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, शुभमन गिल/व्यंकटेश अय्यर

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction