• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा पांड्या बंधू-सूर्याला धक्का, तीन खेळाडू रिटेन, चौथ्यासोबत बोलणी सुरू

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा पांड्या बंधू-सूर्याला धक्का, तीन खेळाडू रिटेन, चौथ्यासोबत बोलणी सुरू

आयपीएल 2022 च्या लिलावाआधी (IPL 2022 Players Retention) मुंबई इंडियन्सने पांड्या बंधूंना मोठा धक्का दिला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्याला (Krunal Pandya) रिटेन न करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : आयपीएल 2022 च्या लिलावाआधी (IPL 2022 Players Retention) मुंबई इंडियन्सने पांड्या बंधूंना मोठा धक्का दिला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्याला (Krunal Pandya) रिटेन न करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. आयपीएलच्या प्रत्येक टीमना 30 नोव्हेंबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला द्यावी लागणार आहे. प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकते. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू असू शकतात. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर कायरन पोलार्डसोबत (Kieron Pollard) टीमची बोलणी सुरू आहेत. तर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) लिलावातून विकत घेण्यासाठी आग्रही आहे. याशिवाय मुंबईची टीम ईशान किशनलाही (Ishan Kishan) रिटेन करण्याची शक्यता जास्त आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली, पण 2021 च्या मोसमात त्यांची कामगिरी खराब झाली. मुंबई इंडियन्सना प्ले-ऑफमध्ये पोहोचता आलं नाही. हार्दिक आणि कृणाल पांड्या यांचा फॉर्म मुंबईच्या या कामगिरीचं प्रमुख कारण ठरला. हार्दिक पांड्याच्या फिटनेसमुळे तो संपूर्ण आयपीएलमध्ये बॉलिंगही करू शकला नव्हता. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली. रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे मुंबईच्या या कामगिरीचे प्रमुख खेळाडू ठरले होते. आयपीएलच्या बहुतेक टीम या चार खेळाडू रिटेन करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत, कारण एवढे खेळाडू रिटेन केले तर लिलावामध्ये नवे खेळाडू विकत घ्यायला कमी पैसे शिल्लक राहणार आहेत. IPL 2022 : CSK ने केला रैनाचा पत्ता कट, ऋतुराजची चांदी, धोनीसोबत स्पेशल करार! काय आहे रिटेन करण्याचा नियम? जर एखाद्या टीमने 4 खेळाडू रिटेन केले तर त्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागतील. एखाद्या टीमने तीन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूसाठी 15 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी आणि तिसऱ्या खेळाडूसाठी 7 कोटी रुपये द्यावे लागतील. दोन खेळाडू कायम ठेवले तर पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी तसंच एकच खेळाडू कायम ठेवला तर त्याला 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
  Published by:Shreyas
  First published: