मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 Auction आधीच डिलींग, जडेजानंतर राहुल-राशीदवरही बॅन?

IPL 2022 Auction आधीच डिलींग, जडेजानंतर राहुल-राशीदवरही बॅन?

आयपीएल 2022 (IPL Players Retention 2022) आधी खेळाडूंना रिटेन करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यातच आता आयपीएलची नवी टीम असलेल्या लखनऊवर (Lucknow) दुसऱ्या टीमनी त्यांचे खेळाडू पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे, यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) केएल राहुल (KL Rahul) आणि सनरायजर्स हैदराबादचा (SRH) राशिद खान (Rashid Khan) यांचा समावेश आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 (IPL Players Retention 2022) आधी खेळाडूंना रिटेन करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आयपीएलच्या सगळ्या 8 टीमनी त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला (BCCI) द्यायची होती. त्यातच आता आयपीएलची नवी टीम असलेल्या लखनऊवर (Lucknow) दुसऱ्या टीमनी त्यांचे खेळाडू पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे, यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) केएल राहुल (KL Rahul) आणि सनरायजर्स हैदराबादचा (SRH) राशिद खान (Rashid Khan) यांचा समावेश आहे. या दोघांनाही लखनऊच्या टीमने ऑफर दिल्याचं वृत्त आहे. याबाबत पंजाब आणि हैदराबादच्या टीमने बीसीसीआयला तक्रार केल्याचं सांगण्यात येत आहे.

आयपीएलच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला लिलावाआधी आपल्या रकमेबाबत दुसऱ्या टीमसोबत डिलींग करायला परवानी नाही. याच कारणामुळे आयपीएल 2010 (IPL 2010) आधी रविंद्र जडेजाचं (Ravindra Jadeja) एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं.

रविंद्र जडेजा 2008 साली पहिल्या मोसमात राजस्थान रॉयल्सच्या टीमसोबत होता, यानंतर 2009 सालीही तो राजस्थानकडून खेळला, यादरम्यान त्याने 430 रन केले. 2008 साली तो आयपीएल जिंकणाऱ्या राजस्थान टीमचा भाग होता. टीमचा कर्णधार शेन वॉर्न जडेजाच्या टॅलेंटमुळे प्रभावी झाला होता, पण 2010 आयपीएल आधी जडेजाने आयपीएल खेळाडूंसाठी असलेले नियम मोडल्याचं समोर आलं. जडेजाविरुद्ध तक्रार आल्यानंतर तो दोषी आढळवला. जडेजा दुसऱ्या टीमकडून जास्त पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण त्याचा करार राजस्थानसोबत आहे, असं तपासात समोर आलं.

राजस्थानच्या टीमला जडेजाला आयपीएल 2010 पर्यंत सोबत ठेवायचं होतं, पण जडेजाची इच्छा फक्त 2009 पर्यंतच थांबण्याची होती, त्यामुळे त्याने दुसऱ्या टीमशी संपर्क केला. जडेजाने मुंबई इंडियन्सच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, तसंच आपले कराराचे कागद दिले आणि मुंबई इंडियन्सकडून कागदपत्रही घेतली, असं आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने सांगितलं. यानंतर जडेजावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. अशाप्रकारच्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असं तेव्हाचे आयपीएल कमिशनर ललित मोदी यांनी सांगितलं.

रविंद्र जडेजा या बंदीमुळे आयपीएल 2010 खेळू शकला नाही, पण तो टीम इंडियाकडून खेळला. 2010 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये जडेजा भारतीय टीममध्ये होता. आयपीएल 2011 साली तो कोची टस्कर्सकडून खेळला, त्याच्यावर जवळपास 9.50 लाख अमेरिकन डॉलरची बोली लावण्यात आली. एका वर्षानंतर कोचीची टीम आयपीएलमधून बाहेर पडली, त्यामुळे जडेजा पुन्हा लिलावात उतरला. यानंतर चेन्नई सुपर किंग्सने जडेजाला 9 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. त्या लिलावात जडेजा सगळ्यात महागडा खेळाडू होता.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction