मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : ...तर CSK प्ले-ऑफमध्ये पोहोचणार, धोनीचा करिश्मा पुन्हा दिसणार!

IPL 2022 : ...तर CSK प्ले-ऑफमध्ये पोहोचणार, धोनीचा करिश्मा पुन्हा दिसणार!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आपला चौथा विजय मिळवला आहे. रविवारी डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सचा (CSK vs DC)  91 रनने पराभव केला.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आपला चौथा विजय मिळवला आहे. रविवारी डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सचा (CSK vs DC)  91 रनने पराभव केला, याचसोबत धोनीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये 8व्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीविरुद्धच्या या विजयासोबत सीएसकेचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न अजून कायम आहे, पण हा प्रवास अत्यंत कठीण असणार आहे.

सीएसकेच्या लीग स्टेजमधल्या आणखी 3 मॅच शिल्लक आहेत. जर या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला, तर ते 7 विजयांसह 14 पॉईंट्सवर जातील, पण त्यांना इतर टीमच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. दिल्लीविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर सीएसकेचा नेट रनरेटही चांगला झाला आहे.

सीएसकेच्या उरलेल्या मॅच

12 मे- मुंबई इंडियन्सविरुद्ध, वानखेडे स्टेडियम

15 मे- गुजरात टायटन्सविरुद्ध, वानखेडे स्टेडियम

20 मे- राजस्थान रॉयल्सविरुद्ध, ब्रेबॉर्न स्टेडियम

गुजरात-लखनऊ मजबूत स्थितीमध्ये

लखनऊ सुपर जाएंट्स आणि गुजरात टायटन्स 16-16 पॉईंट्सह मजबूत स्थितीमध्ये आहेत. तर राजस्थान आणि आरसीबीच्या खात्यात 14-14 पॉईंट्स आहेत. म्हणजेच चेन्नईने उरलेल्या तिन्ही मॅच जिंकल्या तरी ते गुजरात आणि लखनऊच्या पुढे जाणार नाहीत, त्यामुळे आरसीबीचा त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये तसचं राजस्थानचा दिल्ली आणि लखनऊविरुद्ध पराभव व्हावा, अशी प्रार्थना सीएसके करेल.

जर आरसीबी आणि राजस्थान एकही मॅच जिंकली तरीही सीएसकेचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगेल. तसंच चेन्नईला दिल्ली, हैदराबाद आणि पंजाबच्या सामन्यांवरही नजर ठेवावी लागेल, कारण या तिन्ही टीम पॉईंट्स टेबलमध्ये सीएसकेच्या वर आहेत. सीएसकेला प्ले-ऑफमध्ये जाण्याची शक्यता फक्त 3.4 टक्के आहे.

...तर सीएसके प्ले-ऑफमध्ये

मुंबई विरुद्ध केकेआर (कोणाचाही विजय)

लखनऊ विरुद्ध गुजरात (कोणाचाही विजय)

राजस्थान रॉयल्सने दिल्लीला हरवावं

सीएसकेने मुंबईचा पराभव करावा

पंजाब किंग्सने आरसीबीला हरवावं

केकेआरने हैदराबादला हरवावं

लखनऊने राजस्थानला हरवावं

दिल्लीने पंजाबचा पराभव करावा

मुंबईने हैदराबादला हरवावं

लखनऊ केकेआर (कोणीही जिंकावं)

गुजरातने आरसीबीला हरवावं

सीएसकेने राजस्थानला पराभूत करावं

मुंबईने दिल्लीला हरवावं

हैदराबादने पंजाबला हरवावं

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni