Home /News /sport /

IPL 2022 : 'Jos Buttler माझा दुसरा पती', Rajasthan Royals च्या खेळाडूच्या पत्नीचा खळबळजनक दावा

IPL 2022 : 'Jos Buttler माझा दुसरा पती', Rajasthan Royals च्या खेळाडूच्या पत्नीचा खळबळजनक दावा

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सचा ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) धमाका केला आहे. एकीकडे जॉस बटलर मैदानात बॉलर्सवर आक्रमण करत असतानाच राजस्थान रॉयल्सचा खेळाडूच्या पत्नीने खळबळजनक दावा केला आहे.

    मुंबई, 27 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सचा ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) धमाका केला आहे. बटलरने या मोसमात 700 पेक्षा जास्त रन केले आहेत, त्याच्या या कामगिरीमुळे राजस्थान प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे. आता शुक्रवारी राजस्थानचा सामना आरसीबीविरुद्ध  (Rajasthan Royals vs RCB) होणार आहे. या सामन्यात राजस्थानचा विजय झाला तर ते फायनलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यातही जॉस बटलरने मोठी खेळी करावी अशी अपेक्षा राजस्थानची टीम आणि त्यांच्या चाहत्यांना आहे. एकीकडे जॉस बटलर मैदानात बॉलर्सवर आक्रमण करत असतानाच राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रस्सी व्हॅन डर डुसेनच्या पत्नीने (Rassie van der Dussen Wife)  खळबळजनक दावा केला आहे. रस्सीची पत्नी लाराने जॉस बटलर आपला दुसरा पती असल्याचं सांगितलं. जॉस बटलर जेव्हा मैदानाबाहेर सिक्स मारतो तेव्हा कॅमेरा माझ्यावर येतो, त्यामुळे अनेक जण मला बटलरची दुसरी पत्नी समजतात, असं लारा म्हणाली. 'मला वाटतं मी जॉस बटलरला माझा दुसरा नवरा म्हणून स्वीकारलं आहे. मला जॉस बटलरची पत्नी लुईसच्या नावाने ओळखलं जातं, पण मी लुईस नाही. मी तिला अजूनही भेटलेले नाही. मी आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री कायमच राजस्थानला चीअर करत असतो, त्यामुळे आम्ही दोघी कायम कॅमेरासमोर येतो. मी बटलरची पत्नी नाही, पण सध्या मी हे स्वीकारते आणि त्याला सपोर्ट करते,' अशी प्रतिक्रिया लाराने राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्टमध्ये दिली. बटलर विक्रमाच्या उंबरठ्यावर जॉस बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी या मोसमात आतापर्यंत सगळ्या 14 मॅच खेळल्या, यात त्याने 51.28 च्या सरासरीने आणि 148 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत. बटलरने या सिझनमध्ये 718 रन केले आहेत. यात 68 फोर आणि 39 सिक्सचा समावेश आहे. आयपीएल इतिहासात फक्त 7 वेळा एखाद्या खेळाडूला 700 रनचा टप्पा पार करता आला आहे. विराट कोहली (973), डेव्हिड वॉर्नर (848), केन विलियमसन (735), क्रिस गेल (733 आणि 708), माइक हसी (733), जोस बटलर (718*) या खेळाडूंनाच आयपीएलच्या एका मोसमात 700 पेक्षा जास्त रन करता आले आहेत. राजस्थान रॉयल्सला या मोसमात अजून जास्तीत जास्त दोन आणि कमीत कमी एक मॅच खेळण्याची संधी आहे, त्यामुळे बटलर 800 रनचा टप्पाही पार करू शकतो. जॉस बटलर क्वालिफायर-2 च्या सामन्यात 18 रन करू शकला तर तो क्रिस गेल, केन विलियमसन आणि माईक हसीलाही मागे टाकेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या