मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : आयपीएलच्या 2 नव्या टीमचा लिलाव ऑक्टोबरमध्ये, जानेवारीत खेळाडूंवर बोली!

IPL 2022 : आयपीएलच्या 2 नव्या टीमचा लिलाव ऑक्टोबरमध्ये, जानेवारीत खेळाडूंवर बोली!

बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या (IPL Auction) दोन नव्या टीमच्या लिलावाची तयारी केली आहे. 17 ऑक्टोबरला दोन नव्या टीमसाठी लिलाव होऊ शकतो. 2022 च्या आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 टीम मैदानात उतरतील.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 14 सप्टेंबर : बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या (IPL Auction) दोन नव्या टीमच्या लिलावाची तयारी केली आहे. 17 ऑक्टोबरला दोन नव्या टीमसाठी लिलाव होऊ शकतो. 2022 च्या आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 टीम मैदानात उतरतील. यासाठी जानेवारी महिन्यात मेगा ऑक्शन होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयला दोन नव्या टीमच्या माध्यमातून 5 ते 6 हजार कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. टीम वाढल्यामुळे मॅचची संख्याही वाढेल, त्यामुळे बीसीसीआयला ब्रॉडकास्टिंगमधूनही अधिकचे पैसे मिळणार आहेत.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने प्रत्येक संबंधितांना प्रमुख तारखांबाबत सांगितलं आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत टेंडर डॉक्युमेंट विकत घेता येणार आहेत, तर 17 ऑक्टोबरला लिलाव होऊ शकतो. यावेळी ई-ऑक्शन होणार नाही, तर जुन्या नियमांनुसार बंद बोली प्रक्रिया राबवली जाईल.

अशी असणार लिलावाची प्रक्रिया

दोन नव्या टीमसाठी टेंडर डॉक्युमेंट 10 लाख रुपयांना विकलं जाईल. यामध्ये टीम विकत घेण्याची पात्रता, बोली लावण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन टीमच्या अधिकाऱ्यांबाबतची माहिती असेल. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार बोली लावण्यासाठी इच्छूक असणाऱ्या कंपनीला इनव्हिटेशन टू टेंडर म्हणजेच आयटीटी विकत घ्यावं लागणार आहे.

फक्त आयटीटी विकत घेऊन कोणीही आयपीएल टीमवर बोली लावू शकणार नाही. यासाठी अन्य अटी आणि शर्थींचं पाल करावं लागणार आहे. एवढच नाही तर बीसीसीआयला कोणतंही कारण न देता बोली प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने एका टीमची बेस प्राईज 2 हजार कोटी रुपये ठेवली आहे, त्यामुळे दोन टीमकडून त्यांना 5 हजार कोटी रुपये मिळू शकतात. पुढच्या मोसमात 60 ऐवजी 74 मॅच खेळवल्या जातील. सध्याच्या मोसमातल्या उरलेल्या 31 मॅच 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत नव्या टीमच्या बोली प्रक्रियेबाबत अंतिम चर्चा झाली होती. दोन नव्या टीमची बेस प्राईज प्रत्येकी 1700 कोटी रुपये ठेवण्याचा विचार केले गेला होता, पण आता ही किंमत 2000 कोटी रुपये ठेवण्याचं निश्चित केलं गेलं आहे, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं.

वर्षाला 3 हजार कोटींपेक्षा जास्तचा टर्न ओव्हर असणाऱ्या कंपनीला बोली प्रक्रियेत सहभागी व्हायची परवानगी दिली जाईल. तसंच कंपनींच्या समुहाला टीम विकत घ्यायला परवानगी देण्याबाबतही बीसीसीआय विचार करत आहे. जर तीन कंपन्या एकत्र येऊन टीमसाठी बोली लावत असतील, तर बीसीसीआयला यामध्ये कोणतीही अडचण नाही. यामुळे अधिकचे पैसे मिळतील, असं बीसीसीआयला वाटत आहे.

First published:

Tags: BCCI, Ipl