मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : शाहरुख करत होता मुंबईच्या बॉलर्सची धुलाई, अशी होती रितीकाची रिएक्शन

IPL 2022 : शाहरुख करत होता मुंबईच्या बॉलर्सची धुलाई, अशी होती रितीकाची रिएक्शन

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians vs Punjab Kings) खराब कामगिरी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही सुरूच आहे.  या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

पुणे, 13 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians vs Punjab Kings) खराब कामगिरी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही सुरूच आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पंजाबने मुंबईच्या बॉलर्सची धुलाई करत 20 ओव्हरमध्ये 198/5 पर्यंत मजल मारली. शिखर धवनने 50 बॉलमध्ये 70 रन आणि मयंक अग्रवालने 32 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. जितेश शर्माने 15 बॉलमध्ये नाबाद 30 आणि शाहरुखने 6 बॉलमध्ये 15 रन केले.

मुंबईकडून बसिल थंपीला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह आणि मुरुगन अश्विनला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

मुंबईने मोक्याच्या क्षणी मयंक अग्रवाल, शिखर धवन आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनला माघारी पाठवलं, पण शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि जितेश शर्माने (Jitesh Sharma)  मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. शाहरुख खानने मारलेल्या एका सिक्सनंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहची (Ritika Sajdeh) रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहरुख खानने सिक्स मारल्यानंतर कॅमेरामनने त्याचा कॅमेरा रितीकाकडे वळवला, यानंतर रितीकाची ही प्रतिक्रिया मुंबईची अवस्था कशी आहे, हे सांगत होती.

आयपीएलच्या या मोसमात मुंबईची कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. मोसमाच्या पहिल्या चारही सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे, त्यामुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचणं मुंबईसाठी आणखी कठीण होऊन बसलं आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma