मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचं 'सुसाईड', पंजाबविरुद्ध हातातली मॅच गमावली

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचं 'सुसाईड', पंजाबविरुद्ध हातातली मॅच गमावली

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Punjab Kings) लागोपाठ पाचवा पराभव झाला आहे. पंजाब किंग्सने मुंबईला 12 रनने धूळ चारली आहे.

  • Published by:  Shreyas

पुणे, 13 एप्रिल : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Punjab Kings) लागोपाठ पाचवा पराभव झाला आहे. पंजाब किंग्सने मुंबईला 12 रनने धूळ चारली आहे. पंजाबने दिलेलं 199 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या मुंबईला 20 ओव्हरमध्ये 186/9 पर्यंतच मजल मारता आली.

पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली. 32 रनवरच मुंबईचे ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) आऊट झाले, यानंतर डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांनी पंजाबच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. ब्रेविसने राहुल चहरच्या (Rahul Chahar) एकाच ओव्हरमध्ये एक फोर आणि चार सिक्स ठोकले.

ब्रेविसने 25 बॉलमध्ये 49 रन केले, ज्यात 4 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. तिलक वर्माने 20 बॉल 36 रनची खेळी केली. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक करणाऱ्या सूर्यकुमार यादवने 30 बॉलमध्ये 43 रन केले.

पंजाबकडून ओडियन स्मिथला 4 विकेट मिळाल्या, तर कागिसो रबाडाला 2 आणि वैभव अरोराला एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता.

पंजाबने मुंबईच्या बॉलर्सची धुलाई करत 20 ओव्हरमध्ये 198/5 पर्यंत मजल मारली. शिखर धवनने 50 बॉलमध्ये 70 रन आणि मयंक अग्रवालने 32 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. जितेश शर्माने 15 बॉलमध्ये नाबाद 30 आणि शाहरुखने 6 बॉलमध्ये 15 रन केले. मुंबईकडून बसिल थंपीला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह आणि मुरुगन अश्विनला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Punjab kings