मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : 46666, बेबी एबीचा धमाका, पंजाबची टीमही बघत बसली, VIDEO

IPL 2022 : 46666, बेबी एबीचा धमाका, पंजाबची टीमही बघत बसली, VIDEO

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) डेवाल्ड ब्रेविसने धमाका केला आहे. राहुल चहरच्या एकाच ओव्हरमध्ये ब्रेविसने (Dewald Brevis) तब्बल 29 रन काढल्या.

  • Published by:  Shreyas

पुणे, 13 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) डेवाल्ड ब्रेविसने धमाका केला आहे. राहुल चहरच्या एकाच ओव्हरमध्ये ब्रेविसने (Dewald Brevis) तब्बल 29 रन काढल्या. पंजाबने दिलेल्या 199 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना 8 ओव्हरमध्ये मुंबईची अवस्था 63/2 अशी झाली होती. यानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने लेग स्पिनर राहुल चहरच्या (Rahul Chahar) हातात बॉल दिला.

नवव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला तिलक वर्माने एक रन काढून डेवाल्ड ब्रेविसला स्ट्राईक दिला. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला ब्रेविसने फोर मारली, यानंतर पुढच्या चारही बॉलला ब्रेविसने चार सिक्स ठोकले. डेवाल्ड ब्रेविसची ही बॅटिंग बघून चाहत्यांसह कॉमेंटेटरनाही एबी डिव्हिलियर्सची आठवण झाली.

डेवाल्ड ब्रेविसने 25 बॉलमध्ये 49 रनची खेळी केली, यामध्ये 5 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. मुख्य म्हणजे ब्रेविसने बॅटिंगला आल्यानंतर पहिल्या 8 बॉलला एकही रन केली नव्हती.

डेवाल्ड ब्रेविसने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये नाव कमावलं आहे. त्याच्या बॅटिंगमध्ये एबी डिव्हिलियर्सची झलक दिसत असल्यामुळे तो बेबी एबी या नावाने लोकप्रिय झाला आहे.

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये धमाका

डेवाल्ड ब्रेविसने यावर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये धमाका केला होता. तो स्पर्धेतला सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. 6 मॅचमध्ये त्याने 84 पेक्षा जास्तच्या सरासरीने 506 रन केले होते. 18 वर्षांच्या या खेळाडूने वर्ल्ड कपमध्ये 2 शतकं आणि 3 अर्धशतकं केली. या कामगिरीमुळे अनेक फ्रॅन्चायजीचं लक्ष त्याच्यावर होतं. मुंबईने डेवाल्डला 3 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Punjab kings