मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : डिकॉक घेत होता मुंबईचा बदला, पण रोहितने काढलं शेवटचं अस्त्र, आणि खेळ खल्लास!

IPL 2022 : डिकॉक घेत होता मुंबईचा बदला, पण रोहितने काढलं शेवटचं अस्त्र, आणि खेळ खल्लास!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पहिल्या विजयाची प्रतिक्षा करत असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पहिल्या विजयाची प्रतिक्षा करत असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिले बॉलिंग घेतल्यानंतर रोहितच्या रणनितीमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. मॅचची पहिलीच ओव्हर रोहितने तिलक वर्माला दिली, तर दुसरी ओव्हर जयदेव उनाडकट आणि तिसरी ओव्हर लेग स्पिनर मुरुगन अश्विनला दिली. चौथ्या ओव्हरमध्ये रोहितने जसप्रीत बुमराहच्या हातात बॉल दिला.

रोहित शर्माच्या या रणनितीवर कॉमेंट्री करणाऱ्या सुनिल गावसकर आणि मुरली कार्तिक यांनीही प्रश्न उपस्थित केले. मुंबईने टीमचा हुकमी एक्का असलेल्या बुमराहला चौथी ओव्हर दिली. पहिल्या दोन ओव्हर तिलक वर्मा आणि मुरुगन अश्विनने टाकल्यामुळे केएल राहुल आणि क्विंटन डिकॉक सेट झाले आणि त्यांनी मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.

रोहित शर्माने 6 ओव्हरच्या पॉवरप्ले मध्ये 6 बॉलर वापरले. पाचवी ओव्हर टायमल मिल्स तर सहावी ओव्हर फॅबियन ऍलनने टाकली. फॅबियन एलनच्या (Fabian Allen) या ओव्हरला मुंबईला क्विंटन डिकॉकची (Quinton De Kock) विकेट मिळाली.

आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग असलेला डिकॉक यावेळी मुंबईचाच बदला घेण्यासाठी मैदानात उतरला होता, पण मुंबईकडून आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या फॅबियन एलनने डिकॉकला एलबीडब्ल्यू केलं. एलनला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न डिकॉकने केला, पण यात तो अपयशी ठरला

क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल यांच्यात 5.3 ओव्हरमध्ये 52 रनची पार्टनरशीप झाली. 13 बॉलमध्ये 24 रन करून डिकॉक आऊट झाला, त्याच्या या खेळीमध्ये 4 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.

First published:

Tags: Ipl 2022, Lucknow Super Giants, Mumbai Indians