मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : फॅबियन एलनचं भारतासोबत आहे खास कनेक्शन, मुंबई इंडियन्सने दिली संधी!

IPL 2022 : फॅबियन एलनचं भारतासोबत आहे खास कनेक्शन, मुंबई इंडियन्सने दिली संधी!

Photo-Mumbai Indians

Photo-Mumbai Indians

वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर फॅबियन एलन (Fabian Allen) याचं मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians पदार्पण झालं आहे. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या (MI vs LSG) सामन्यात कायरन पोलार्डने एलनला मुंबई इंडियन्सची टोपी दिली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 एप्रिल : वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर फॅबियन एलन (Fabian Allen) याचं मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians पदार्पण झालं आहे. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या (MI vs LSG) सामन्यात कायरन पोलार्डने एलनला मुंबई इंडियन्सची टोपी दिली. बॉलिंगमध्ये फॅबियन एलनला एक विकेट मिळाली असली तरी त्याची कामगिरी निराशाजनक झाली. 4 ओव्हरमध्ये त्याने 46 रन दिले. क्विंटन डिकॉकला (Quinton De Kock) एलनने एलबीडब्ल्यू केलं.

वेस्ट इंडिजच्या फॅबियन एलनचं भारतासोबत खास नातं आहे. एलनचं वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पदार्पण भारतामध्येच झालं आहे. एलनचं वनडे पदार्पण ऑक्टोबर 2018 साली पुण्यात झालं होतं. वेस्ट इंडिजने तो सामना 43 रनने जिंकला होता. या सामन्यात त्याने फक्त 5 रन केले होते, तसंच त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.

एलनचं टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण कोलकात्यामध्ये 4 नोव्हेंबर 2018 ला झालं होतं. भारताने तो सामना 5 विकेटने जिंकला होता. वेस्ट इंडिजने 8 विकेट गमावून 109 रन केले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 13 बॉल शिल्लक असताना केला. एलनने त्या सामन्यात 20 बॉलमध्ये 4 फोर मारत 27 रन केले होते, पण त्याला एकही विकेट घेण्यात यश आलं नव्हतं.

26 वर्षांच्या एलनने आतापर्यंत 20 वनडे आणि 34 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. वनडेमध्ये त्याच्या नावावर 7 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 24 विकेट आहेत. याशिवाय त्याने वनडेमध्ये एक अर्धशतकाच्या मदतीने 200 रन आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 267 रन केले आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians