Home /News /sport /

IPL 2022 : रोहितची टीम सहाव्यांदा होणार चॅम्पियन! Mumbai Indians ची टीम आणि संपूर्ण वेळापत्रक

IPL 2022 : रोहितची टीम सहाव्यांदा होणार चॅम्पियन! Mumbai Indians ची टीम आणि संपूर्ण वेळापत्रक

आयपीएल 2022 ला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलची सगळ्यात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) त्यांचा पहिला सामना 27 मार्चला खेळेल. मुंबईचा हा सामना दिल्लीविरुद्ध (MI vs DC) ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल.

  मुंबई, 23 मार्च : आयपीएल 2022 ला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होईल. तर आयपीएलची सगळ्यात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) त्यांचा पहिला सामना 27 मार्चला खेळेल. मुंबईचा हा सामना दिल्लीविरुद्ध (MI vs DC) ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल. आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईची मागच्या मोसमातली कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल 2021 मध्ये मुंबईला प्ले-ऑफमध्येही प्रवेश करता आला नव्हता. आयपीएलच्या मागच्या मोसमातल्या खराब कामगिरीनंतर टीमने यंदा बरेच बदल केले आहेत. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे दोन बंधू आता वेगळ्या टीमकडून खेळताना दिसतील. तर क्विंटन डिकॉक आणि ट्रेन्ट बोल्ट हेदेखील आता मुंबईच्या टीमचा भाग नाहीत. आयपीएल लिलावामध्ये मुंबईने नव्याने टीमची बांधणी केली. आयपीएल लिलावात मुंबईने इशान किशनला (Ishan Kishan) तब्बल 15.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. इशान किशन यंदाच्या आयपीएल लिलावातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. याशिवाय टीमने टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस या नवोदित आक्रमक बॅटरना संधी दिली आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर याच्यावरही यशस्वी बोली लावून मुंबईने अनेकांना धक्का दिला, पण दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर या मोसमात खेळू शकणार नाही. आयपीएल लिलावाआधी मुंबईने रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड या खेळाडूंना रिटेन केलं. स्टार खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये रोहित शर्माची मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज आहे. मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक
  तारीखमॅचठिकाणवेळ
  27 मार्चदिल्ली विरुद्ध मुंबईब्रेबॉर्न स्टेडियमदुपारी 3.30 वाजता
  2 एप्रिलमुंबई विरुद्ध राजस्थानडी.वाय.पाटील स्टेडियमदुपारी 3.30 वाजता
  6 एप्रिलकोलकाता विरुद्ध मुंबईएमसीए स्टेडियम, पुणेसंध्याकाळी 7.30 वाजता
  9 एप्रिलबँगलोर विरुद्ध मुंबईएमसीए स्टेडियम, पुणेसंध्याकाळी 7.30 वाजता
  13 एप्रिलमुंबई विरुद्ध पंजाबएमसीए स्टेडियम, पुणेसंध्याकाळी 7.30 वाजता
  16 एप्रिलमुंबई विरुद्ध लखनऊब्रेबॉर्न स्टेडियमदुपारी 3.30 वाजता
  21 एप्रिलमुंबई विरुद्ध चेन्नईडी.वाय.पाटील स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  24 एप्रिललखनऊ विरुद्ध मुंबईवानखेडे स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  30 एप्रिलराजस्थान विरुद्ध मुंबईडी.वाय. पाटील स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  6 मेगुजरात विरुद्ध मुंबईब्रेबॉर्न स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  9 मेमुंबई विरुद्ध कोलकाताडी.वाय.पाटील स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  12 मेचेन्नई विरुद्ध मुंबईवानखेडे स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  17 मेमुंबई विरुद्ध हैदराबादवानखेडे स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  21 मेमुंबई विरुद्ध दिल्लीवानखेडे स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  मुंबईची टीम रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma

  पुढील बातम्या