Home /News /sport /

IPL 2022 : मुंबईचा पहिलाच सामना दिल्लीशी, रोहित या Playing XI सोबत मैदानात उतरणार!

IPL 2022 : मुंबईचा पहिलाच सामना दिल्लीशी, रोहित या Playing XI सोबत मैदानात उतरणार!

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेली मुंबई इंडियन्स रविवारी म्हणजेच 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) पहिला सामना खेळेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 मार्च : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. पहिलाच सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होईल. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेली मुंबई इंडियन्स रविवारी म्हणजेच 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) पहिला सामना खेळेल. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना रंगेल. मुंबई आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत आयपीएलमध्ये 30 सामने झाले, यातल्या 16 सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला तर 12 मॅच दिल्लीने जिंकल्या. आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली, पण त्यांना फायनलमध्ये मजल मारता आली नाही. दुसरीकडे मुंबईला प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळाला नाही. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 10 टीम सहभागी होणार आहेत, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन घेण्यात आला, या लिलावामध्ये प्रत्येक टीमने त्यांचे खेळाडू बदलले, त्यामुळे मुंबईच्या टीममध्येही बदल झाले. मुंबई इंडियन्सने हार्दिक आणि कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, ट्रेन्ट बोल्ट या खेळाडूंना लिलावात विकत घेतलं नाही, त्यामुळे आता या मोसमात मुंबईची नवी टीम दिसणार आहे. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोणाला संधी देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) खेळणार का नाही, याबाबत साशंकता आहे, कारण वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजवेळी सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती, त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्येही खेळू शकला नव्हता. सूर्यकुमार यादव फिट झाला नाही तर तिलक वर्माला (Tilak Varma) संधी मिळू शकते. मुंबईची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव/तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, टीम डेव्हिड, कायरन पोलार्ड, मुरुगन अश्विन, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह, बसिल थंपी/जयदेव उनाडकट, टायमल मिल्स
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma

    पुढील बातम्या