मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा का होतोय सारखा पराभव? वाचा Inside Story

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा का होतोय सारखा पराभव? वाचा Inside Story

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) यंदाच्या मोसमातली (IPL 2022) कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा या सिझनमध्ये पहिल्या 4 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई 10 एप्रिल : आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) यंदाच्या मोसमातली (IPL 2022) कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा या सिझनमध्ये पहिल्या 4 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. शनिवारी आरसीबीने मुंबईचा 7 विकेटने पराभव केला, यानंतर आता रोहितच्या (Rohit Sharma) टीमवर प्ले-ऑफमध्येही जागा न मिळवण्याचं संकट ओढावू शकतं. पण मुंबई इंडियन्सने याआधीही खराब सुरूवात केल्यानंतर प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. 2015 साली मुंबईने अशीच सुरूवात करून प्ले-ऑफ गाठली होती.

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) याच्या मते मात्र यंदा मुंबईचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं कठीण आहे. इरफानने मुंबईच्या टीममधल्या कमजोरी सांगितल्या आहेत, ज्यामुळे टीमने लागोपाठ 4 मॅच गमावल्या आहेत.

मुंबई इंडियन्सचा इतिहास बघितला तर टीमने चार वेळा लागोपाठ 4 मॅच गमावल्या. 2008, 2014, 2015 आणि 2022 साली मुंबईचा लागोपाठ 4 मॅचमध्ये पराभव झाला. यातल्या 2015 साली टीमने 10 पैकी 8 मॅच जिंकून प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं, तसंच आयपीएल ट्रॉफीही जिंकली.

जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) साथ देण्यासाठी मुंबईकडे पर्यायाची कमी आहे, त्यामुळे मुंबई 2022 साली प्ले-ऑफ गाठण्याची शक्यता कमी आहे, अशी प्रतिक्रिया इरफान पठाणने दिली.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफान पठाण म्हणाला, 'या परिस्थितीमधून पुनरागमन कसं करायचं हे मुंबई इंडियन्सना माहिती आहे. मुंबईने 2014 आणि 2015 साली अशी कामगिरी केली आहे. 2015 मध्ये त्यांची कामगिरी समान होती आणि तेव्हा टीमने पुनरागमन करत ट्रॉफी जिंकली होती, पण यंदा त्यांची टीम वेगळी आहे. यावर्षी त्यांच्याकडे बुमराहला सपोर्ट करेल, असा बॉलर नाही. कर्णधार रोहित शर्मासाठी ही डोकेदुखी आहे.'

'मुंबईची बॅटिंग मात्र उत्कृष्ट आहे, त्यांच्याकडे तिलक वर्मा चांगली बॅटिंग करत आहे. मागच्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवनेही प्रभावित केलं. इशान किशनही चांगली बॅटिंग करत आहे. रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डही रन करतील, अशी अपेक्षा आहे. मुंबईची बॉलिंग मात्र कमोजर दिसत आहे,' असं वक्तव्य इरफानने केलं.

बुमराह ठरतोय अपयशी

आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का असलेला बुमराहही अपयशी ठरत आहे. 4 मॅचपैकी 3 सामन्यांमध्ये बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. दिल्लीविरुद्ध त्याने 43 रन, केकेआरविरुद्ध 26 रन आणि आरसीबीविरुद्ध 31 रन देत एकही विकेट मिळवली नाही. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये बुमराहने 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians