मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : पुढच्या आयपीएलसाठी मुंबईची नजर या स्टार खेळाडूंवर, दोघांना करणार रिलीज?

IPL 2022 : पुढच्या आयपीएलसाठी मुंबईची नजर या स्टार खेळाडूंवर, दोघांना करणार रिलीज?

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. या खराब कामगिरीनंतर मुंबई पुढच्या मोसमात टीममध्ये काही बदल करू शकते.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. या खराब कामगिरीनंतर मुंबई पुढच्या मोसमात टीममध्ये काही बदल करू शकते.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. या खराब कामगिरीनंतर मुंबई पुढच्या मोसमात टीममध्ये काही बदल करू शकते.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. आयपीएलच्या 15 मोसमांमधली मुंबईची ही निराशाजनक कामगिरी आहे. पहिले 6 सामने गमावल्यामुळे आता मुंबईचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणंही कठीण झालं आहे.

10 टीमची स्पर्धा असल्यामुळे या मोसमाआधी प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी होती, त्यामुळे प्रत्येक टीमला उरलेले खेळाडू रिलीज करावे लागले, याचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला. मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं. मुंबईला हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ट्रेन्ट बोल्ट आणि राहुल चहर या महत्त्वाच्या खेळाडूंना रिलीज करावं लागलं.

मुंबईने लिलावामध्ये इशान किशनला (Ishan Kishan) 15.25 कोटी, टीम डेव्हिडला (Tim David) 8.25 कोटी, जोफ्रा आर्चरला 8 कोटी रुपयांना विकत घेतलं. इशान किशन हा मुंबईचा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. या तीन खेळाडूंवरच एवढी मोठी रक्कम खर्च झाल्यामुळे मुंबईला इतर खेळाडूंना विकत घेण्यासाठी तडजोड करावी लागली, ज्याचा फटका टीमला आयपीएलमध्ये बसत आहे.

स्पिनरची कमी

आयपीएलच्या पुढच्या मोसमात जोफ्रा आर्चर (Jofra Archer) फिट झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या बॉलिंगला आणखी धार येईल, पण टीममध्ये अजूनही उत्कृष्ट स्पिनरची कमी आहे, त्यामुळे मुंबईला चांगला स्पिनर शोधावा लागणार आहे. आयपीएलच्या या मोसमात मुंबईकडून मुरुगन अश्विन हा लेग स्पिनर खेळला आहे, तर मयंक मार्कंडेला अजून खेळण्याची संधी मिळालेली नाही.

एडम झम्पा पर्याय

आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झम्पावर (Adam Zampa) कोणत्याच टीमने बोली लावली नव्हती, त्यामुळे मुंबई झम्पाचा विचार करू शकते. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला, झम्पा या टीमचा सदस्य होता. याआधी आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतानाही झम्पाने चांगली कामगिरी केली होती.

आयपीएलच्या नियमानुसार लिलावानंतर एखाद्या खेळाडूला विकत घ्यायचं असेल, तर आधी झालेल्या लिलावात त्याचं नाव असणं गरजेचं आहे. एडम झम्पाने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावासाठी स्वत:चं नाव नोंदवलं होतं, पण त्याच्यावर बोली लागली नाही.

मुंबई कोणाला रिलीज करणार?

एडम झम्पाला विकत घेण्यासाठी मुंबईला एका खेळाडूला रिलीज करावं लागेल, कारण प्रत्येक टीम जास्तीत जास्त 8 परदेशी खेळाडू टीममध्ये ठेवू शकते. या आयपीएलमध्ये मुंबईने 8.25 कोटींच्या टीम डेव्हिडला 2 मॅचनंतरच बाहेर केलं, तर 2.6 कोटींच्या डॅनियल सॅम्सलाही (Daniel Sams) खराब कामगिरीनंतर डच्चू देण्यात आला. 1.50 कोटींचा टायमल मिल्सची (Tymall Mills) कामगिरीही निराशाजनक झाली आहे, त्यामुळे मुंबई यांच्यापैकी एका खेळाडूला रिलीज करण्याचा निर्णय घेऊन झम्पाला टीममध्ये घेण्याचा विचार करू शकते.

बेन स्टोक्सचं काय?

यंदा टीमची संख्या 10 झाल्यामुळे मेगा ऑक्शन घेण्यात आला, तसंच प्रत्येक खेळाडूसोबत 3 वर्षांसाठी करार झाला होता, त्यामुळे आता पुढचा लिलाव झाला तरी आयपीएल 2025 आधी होईल. इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) याने यंदाच्या लिलावासाठी नावाची नोंदणी केलेली नव्हती, त्यामुळे आता स्टोक्सला आयपीएल खेळायची असेल, तर बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. स्टोक्ससारख्या मॅच विनरला टीममध्ये घेण्यासाठी फक्त मुंबईच नाही तर इतर टीमदेखील आग्रही असतील.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians