मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : 6 मॅच आणि 6 चुका, सहाव्यांदा चॅम्पियन होण्याचं मुंबईचं स्वप्न असं भंगलं!

IPL 2022 : 6 मॅच आणि 6 चुका, सहाव्यांदा चॅम्पियन होण्याचं मुंबईचं स्वप्न असं भंगलं!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. यंदाच्या मोसमातला मुंबईचा हा सलग सहावा पराभव आहे. या मोसमात मुंबईला अजूनपर्यंत एकही मॅच जिंकता आलेली नाही. पाचवेळची चॅम्पियन असलेल्या मुंबईने या मोसमात बऱ्याच चुका केल्या, याचा फटका त्यांना बसत आहे.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. यंदाच्या मोसमातला मुंबईचा हा सलग सहावा पराभव आहे. या मोसमात मुंबईला अजूनपर्यंत एकही मॅच जिंकता आलेली नाही. पाचवेळची चॅम्पियन असलेल्या मुंबईने या मोसमात बऱ्याच चुका केल्या, याचा फटका त्यांना बसत आहे.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. यंदाच्या मोसमातला मुंबईचा हा सलग सहावा पराभव आहे. या मोसमात मुंबईला अजूनपर्यंत एकही मॅच जिंकता आलेली नाही. पाचवेळची चॅम्पियन असलेल्या मुंबईने या मोसमात बऱ्याच चुका केल्या, याचा फटका त्यांना बसत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा 18 रनने पराभव झाला आहे. यंदाच्या मोसमातला मुंबईचा हा सलग सहावा पराभव आहे. या मोसमात मुंबईला अजूनपर्यंत एकही मॅच जिंकता आलेली नाही. पॉईंट्स टेबलमध्येही शून्य पॉईंट्ससह मुंबई शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.

लागोपाठ 6 पराभव झाल्यामुळे आता मुंबईचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं जवळपास अशक्य झालं आहे. आता उरलेल्या 8 सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला, तरी त्यांच्या खात्यात 16 पॉईंट्स होतील. अशा परिस्थितीमध्ये त्यांना इतर टीमच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागू शकतं. पाचवेळची चॅम्पियन असलेल्या मुंबईने या मोसमात बऱ्याच चुका केल्या, याचा फटका त्यांना बसत आहे.

लिलावात केल्या चुका

आयपीएल 2022 मध्ये मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं, यानंतर टीमने लिलावामध्ये (IPL Auction 2022) इशान किशन, टीम डेव्हिड आणि जोफ्रा आर्चर यांच्यावर सर्वाधिक पैसे खर्च केले. मुंबईने इशान किशनला 15.25 कोटी, टीम डेव्हिडला 8.25 कोटी आणि जोफ्रा आर्चरला 8 कोटी रुपयांना विकत घेतलं. या तीन खेळाडूंवर एवढे पैसे खर्च झाल्याने मुंबईला लिलावात इतर खेळाडू विकत घेताना तडजोड करावी लागली, यामुळे मुंबईला चांगला स्पिनर आणि फास्ट बॉलरही विकत घेता आला नाही.

इशान किशनवर एवढी रक्कम खर्च करण्यावरून शेन वॉटसनने मुंबईवर निशाणा साधला. इशान किशनवर एवढे पैसे खर्च करण्याचा मुंबईचा निर्णय फसला. इशान प्रतिभावान आहे, पण संपूर्ण रक्कम खर्च करण्याइतका तो पात्र नाही. मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे, याचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, असं वॉटसन म्हणाला.

16 कोटींचे खेळाडू मैदानाबाहेर

जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यंदाची आयपीएल खेळणार नाही, हे माहिती असतानाही मुंबईने त्याच्यावर बोली लावली. तर पहिल्या दोन मॅचनंतर त्यांनी टीम डेव्हिडलाही (Tim David) बाहेर केलं, म्हणजेच डेव्हिडचे 8.25 कोटी आणि आर्चरचे 8 कोटी, असे 16.25 कोटींचे खेळाडूच मुंबईकडून खेळत नाहीयेत.

सॅम्समुळे गमावल्या 2 मॅच

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर असलेल्या डॅनियल सॅम्सवर (Daniel Sams) मुंबईने प्रमाणाबाहेर विश्वास दाखवला, पण मुंबईच्या दोन पराभवांचा व्हिलन सॅम्स ठरला. दिल्लीविरुद्ध सॅम्सने एका ओव्हरमध्ये 24 रन आणि केकेआरविरुद्ध एकाच ओव्हरमध्ये 35 रन दिले. याशिवाय राजस्थानविरुद्ध मुंबईच्या हातात विजय असतानाही सॅम्सने खराब शॉट मारला, ज्यामुळे तो पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला.

रोहितचा फॉर्म आणि रणनिती

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्म आणि त्याच्या रणनितीवरही टीका होत आहे. रोहितने 6 मॅचच्या 6 इनिंगमध्ये 19 ची सरासरी आणि 129.54 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. या मोसमात रोहितला अजून एकही अर्धशतक करता आलेलं नाही. याचसोबत कर्णधार म्हणून रोहितच्या रणनितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात रोहितने पार्ट टाईम बॉलर तिलक वर्माला पहिली ओव्हर दिली, तर टीमचा हुकमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह चौथी ओव्हर टाकण्यासाठी आला, यावरूनही रोहितवर टीका होत आहे.

बुमराहचा संघर्ष

आयपीएल 2022 मध्ये 6 सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) फक्त 2 मॅचमध्येच विकेट घेता आल्या. बुमराहने राजस्थानविरुद्ध 3 आणि पंजाबविरुद्ध 1 विकेट घेतली, उरलेल्या चारही सामन्यांमध्ये बुमराहला एकही विकेट घेता आली नाही.

इशान किशनवर किंमतीचा दबाव

इशान किशन (Ishan Kishan) हा आतापर्यंतचा मुंबईचा सगळ्यात महागडा खेळाडू आहे. लिलावामध्ये मुंबईने इशानवर 15.25 कोटी रुपये खर्च केले. यानंतर पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतकं तर केली, पण यानंतर त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. 6 मॅचमध्ये 38.20 ची सरासरी आणि 117.17 च्या स्ट्राईक रेटने त्याने 191 रन केले आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians