मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबईचा सलग चौथा पराभव, रोहितचा हुकमी एक्काच ठरतोय पराभवाचं कारण!

IPL 2022 : मुंबईचा सलग चौथा पराभव, रोहितचा हुकमी एक्काच ठरतोय पराभवाचं कारण!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा (RCB vs MI) 7 विकेटने पराभव झाला आहे.

  • Published by:  Shreyas

पुणे, 9 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा (RCB vs MI) 7 विकेटने पराभव झाला आहे. मुंबईने दिलेलं 152 रनचं आव्हान आरसीबीने 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला मुंबईचा हा लागोपाठ चौथा पराभव आहे. मुंबईला यावर्षी अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही. आरसीबीआधी दिल्ली, राजस्थान आणि केकेआरने मुंबईचा पराभव केला.

बॅटिंगसोबतच मुंबई इंडियन्सची बॉलिंगमधली कामगिरीही निराशाजनक झाली आहे. मुंबईच्या या संघर्षाचं कारण ठरत आहे, टीमचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कामगिरी. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या 4 पैकी 3 मॅचमध्ये बुमराहला एकही विकेट मिळालेली नाही. दिल्लीविरुद्ध त्याने 43 रन, केकेआरविरुद्ध 26 रन आणि आरसीबीविरुद्ध 31 रन देत एकही विकेट मिळवली नाही. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये बुमराहने 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईच्या विजयांमध्ये बुमराहचा मोठा वाटा होता. मोक्याच्या क्षणी बुमराह रोहित शर्माला विकेट घेऊन द्यायचा, तसंच दुसऱ्या बाजूने विरोधी टीमच्या बॅटरवर दबाव टाकण्यासाठी मुंबईकडे इतर बॉलरही होते. यंदा मात्र बुमराह संघर्ष करताना दिसत आहे, तसंच दुसऱ्या बाजूने विरोधी टीमवर दबाव टाकणारा बॉलर शोधण्यातही मुंबईला अपयश आलं आहे.

आरसीबीविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने फक्त 2 परदेशी खेळाडूंना घेऊनच खेळण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात डेवाल्ड ब्रेविस आणि कायरन पोलार्ड हे दोन परदेशी खेळाडू मुंबईकडून मैदानात उतरले. आयपीएल नियमानुसार एखादी टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू मैदानात उतरवू शकते. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच मुंबईने फक्त 2 परदेशी खेळाडूंना खेळण्याचा निर्णय घेतला होता.

पॉईंट्स टेबलमध्येही मुंबईची टीम नवव्या क्रमांकावर आहे, तर चार वेळची चॅम्पियन सीएसके शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईप्रमाणेच चेन्नईनेही पहिल्या चारही मॅच गमावल्या आहेत, पण सीएसकेचा नेट रनरेट मुंबईपेक्षा खराब असल्यामुळे ते दहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Jasprit bumrah, Mumbai Indians, RCB, Rohit sharma