Home /News /sport /

IPL 2022 : मुंबईने शोधला रोहितचा उत्तराधिकारी, हा खेळाडू होणार कॅप्टन!

IPL 2022 : मुंबईने शोधला रोहितचा उत्तराधिकारी, हा खेळाडू होणार कॅप्टन!

आयपीएल 2022 चा लिलाव (IPL Auction 2022) फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. आयपीएलच्या सगळ्या टीम आता लिलावाची तयारी करत असतानाच श्रेयस अय्यरबाबत (Shreyas Iyer) महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

    मुंबई, 10 जानेवारी : आयपीएल 2022 चा लिलाव (IPL Auction 2022) फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना रिटेन केलं, तर दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद लिलावाआधी प्रत्येकी 3-3 खेळाडूंना थेट विकत घेणार आहे. आयपीएलच्या सगळ्या टीम आता लिलावाची तयारी करत असतानाच श्रेयस अय्यरबाबत (Shreyas Iyer) महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आयपीएल 2020 मध्ये श्रेयसने त्याच्या नेतृत्वाने अनेकांना प्रभावित केलं होतं. आयपीएल 2020 मध्ये श्रेयस कॅप्टन असलेली दिल्लीची टीम फायनलमध्ये पोहोचली होती, पण मुंबईने त्यांना धूळ चारली. यानंतर आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंतला (Rishabh Pant) दिल्लीचं कर्णधार करण्यात आलं. आता दिल्लीची टीम पंतलाच कर्णधार म्हणून कायम ठेवणार असल्यामुळे श्रेयस अय्यरने दिल्लीची टीम सोडण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यरला टीममध्ये विकत घेण्यासाठी आता दोन टीम आग्रही आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार केकेआर (KKR) श्रेयस अय्यरवर बोली लावण्यासाठी इच्छुक आहे. कोलकात्याने इयन मॉर्गनला (Eoin Morgan) रिटेन केलं नाही, त्यामुळे ते श्रेयस अय्यरकडे कर्णधार म्हणून पाहत आहेत. तर स्पोर्ट्स टुडेने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सही (Mumbai Indians) श्रेयस अय्यरला टीममध्ये घेण्यासाठी आग्रही आहे. मुंबई श्रेयस अय्यरला रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून तयार करण्यासाठी इच्छुक आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या मुंबईचा कर्णधार आहे, त्याच्या नेतृत्वात मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. रबाडा-स्टॉयनिससोबत चर्चा माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार लखनऊची टीम दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिस यांच्यासोबत चर्चा करत आहे. लिलावाआधी लखनऊ डेव्हिड वॉर्नरलाही (David Warner) टीममध्ये घेऊ शकते. मागच्या मोसमात वॉर्नर हैदराबादकडून खेळला होता, पण त्याला सुरुवातीला हैदराबादने कॅप्टन्सीवरून काढलं आणि मग टीममधूनही डच्चू दिला. यानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) में त्याने धमाकेदार कामगिरी केली होती, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. केएल राहुलला (KL Rahul) लखनऊचा कर्णधार केलं जाण्याचंही वृत्त आहे. मागच्या मोसमात राहुल पंजाब किंग्सकडून खेळला होता. तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अहमदाबादचा कर्णधार होईल, असं सांगितलं जातंय. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सनी रिटेन केलं नव्हतं, तर राहुलने पंजाबसोबत न राहण्याचा निर्णय घेतला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, KKR, Mumbai Indians, Shreyas iyer

    पुढील बातम्या