मुंबई, 16 मे : सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पाच वेळची चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. टीमने 12 पैकी 9 मॅच हरल्या आहेत, त्यामुळे ते प्ले-ऑफच्या रेसमधून आधीच बाहेर झाले आहेत. सूर्याच्या दुखापतीमुळे आता त्याच्याऐवजी उत्तराखंडचा डावखुराल फास्ट बॉलर आकाश मधवालला (Aakash Madhwal) मुंबईने संधी दिली आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे सुरूवातीच्या काही मॅचही खेळू शकला नव्हता. आता सूर्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी खेळण्याची शक्यताही कमी आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सूर्याची कामगिरी चांगली झाली होती, त्याने 8 मॅचमध्ये 43 च्या सरासरीने 303 रन केले होते, यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता, तसंच त्याने 146 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली होती. मुंबईकडून सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर होता. तिलक वर्माने (Tilak Varma) सर्वाधिक 368 तर इशान किशनने (Ishan Kishan) 327 रन केले आहेत, पण दोघांनी सूर्यापेक्षा 4-4 मॅच जास्त खेळल्या आहेत.
कोण आहे आकाश मधवाल?
28 वर्षांच्या आकाश मधवालकडे फार अनुभव नाही, त्याने 15 टी-20 मध्ये 27 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या आहेत. 16 रन देऊन 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 7.55 च्या इकोनॉमी रेटने त्याने बॉलिंग केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 6 मॅचमध्ये 8 तर लिस्ट ए च्या 11 मॅचमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत. मुंबईने या मोसमातल्या उरलेल्या 2 सामन्यांसाठी टीममध्ये निवडण्यात आलं आहे. 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर त्याला मुंबईने विकत घेतलं.
🚨 SQUAD UPDATE 🚨 Akash Madhwal replaces Suryakumar Yadav for the rest of the 2022 season. Read more 👇#OneFamily #DilKholKe #MumbaiIndianshttps://t.co/mJsXkFAkbD
— Mumbai Indians (@mipaltan) May 16, 2022
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सची आयपीएल इतिहासातली ही सगळ्यात खराब कामगिरी आहे. टीमने या मोसमातल्या सुरूवातीच्या 8 मॅच गमावल्या होत्या. मागच्या मोसमातही त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. कर्णधार रोहित शर्माची बॅटही या मोसमात शांत आहे, आतापर्यंत त्याला एकही अर्धशतक करता आलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Suryakumar yadav