Home /News /sport /

IPL 2022 : रोहितची अर्जुन तेंडुलकरसोबत 'मराठी'ची शाळा, हा VIDEO पाहाच!

IPL 2022 : रोहितची अर्जुन तेंडुलकरसोबत 'मराठी'ची शाळा, हा VIDEO पाहाच!

आयपीएल 2022 ला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, त्याआधी सगळ्या 10 टीमच्या तयारीला सुरूवात झाली आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एक व्हिडिओ शेयर केला, या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) टीमच्या खेळाडूंची चौकशी करत आहे. रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरशी (Arjun Tendulkar) मराठीमध्ये संवाद साधला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 मार्च : आयपीएल 2022 ला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, त्याआधी सगळ्या 10 टीमच्या तयारीला सुरूवात झाली आहे. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) खेळाडूही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात नेटमध्ये घाम गाळत आहेत. मुंबई इंडियन्सने रविवारी एक व्हिडिओ शेयर केला, या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा टीमच्या खेळाडूंची चौकशी करत आहे. रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरशी (Arjun Tendulkar) मराठीमध्ये संवाद साधला. व्हिडिओच्या सुरूवातीलाच रोहित शर्मा 'एकमेव अर्जुन तेंडुलकर' असं म्हणून त्याची ओळख करून देतो. यानंतर रोहित त्याला घरी कसं काय सगळं? असं विचारतो, त्यावर अर्जुन मस्त असं उत्तर देतो. यानंतर रोहितने त्याला आई, बाबा आणि बहीण कसे आहेत? असा प्रश्न विचारला, तेव्हा बहीण लंडनमध्ये असल्याचं अर्जुन त्याला म्हणाला. या व्हिडिओमध्ये कायरन पोलार्डही दिसत आहे, ज्याला हॉटेल रूममध्ये त्याची जर्सी देण्यात आली. पोलार्ड आणि रोहित यांची 'एमआय एरिना' मध्ये भेट झाली, जिकडे सगळे कोच आणि खेळाडू उपस्थित होते. या व्हिडिओमध्ये इशान किशन खेळण्यातल्या बंदुकीसोबत खेळतानाही दिसत आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या खेळाडूंसाठी मुंबईच्या जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये बायो सिक्युर 'एमआय एरिना' तयार केला आहे. हा भाग जवळपास 13 हजार स्क्वेअर मीटर पसरला आहे. यामध्ये फूटबॉल ग्राऊंड, बॉक्स क्रिकेट, बॉल कोर्ट, फूट व्हॉलीबॉल, एमआय बॅटलग्राऊंड, गोल्फ ड्रायव्हिंग रेंज, मिनी गोल्फ, किड्स झोन आणि एमआय कॅफे या सुविधा उपलब्ध आहेत. मुंबई इंडियन्सने 2020 साली शेवटची आयपीएल ट्रॉफी जिंकली होती, तेव्हा त्यांनी फायनलमध्ये दिल्लीला पराभूत केलं होतं. मागच्या मोसमात मात्र त्यांची कामगिरी निराशाजनक झाली. यंदाच्या मोसमात मुंबईचा पहिला सामना 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये ही मॅच होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Arjun Tendulkar, Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma

    पुढील बातम्या