मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सची बॉलिंग 'फॅक्ट्री', इकडे गेलेला फॉर्म परत मिळेल!

IPL 2022 : मुंबई इंडियन्सची बॉलिंग 'फॅक्ट्री', इकडे गेलेला फॉर्म परत मिळेल!

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदा मैदानात (IPL 2022) संघर्ष करताना दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या पहिल्या 4 सामन्यांपैकी सगळ्या मॅचमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. मुंबईच्या या कामगिरीचं प्रमुख कारण ठरत आहे, त्यांची खराब बॉलिंग.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

पुणे, 13 एप्रिल : आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदा मैदानात (IPL 2022) संघर्ष करताना दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या पहिल्या 4 सामन्यांपैकी सगळ्या मॅचमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. मुंबईच्या या कामगिरीचं प्रमुख कारण ठरत आहे, त्यांची खराब बॉलिंग. टीमचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहला 4 पैकी 3 मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नाही. बुमराह वगळता टीममध्ये विकेट घेईल, असा बॉलरही दिसत नाही.

मुंबई इंडियन्सची बॉलिंग म्हणजे संघर्ष करणाऱ्या बॅटरना फॉर्म परत मिळवून देणारी फॅक्ट्री झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मोसमात मुंबईने खेळलेल्या पहिल्या 5 सामन्यांवरून तरी असंच म्हणावं लागेल, कारण आयपीएलमध्ये संघर्ष करणाऱ्या खेळाडूंना मुंबईविरुद्ध सूर गवसला.

शिखर धवन-मयंक अग्रवाल

पंजाब किंग्सचे ओपनर असलेले मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) या जोडीला आधीच्या सामन्यांमध्ये चांगली सुरूवात करून देता आली नाही, पण मुंबईविरुद्ध या दोघांमध्ये 9.3 ओव्हरमध्ये 97 रनची पार्टनरशीप झाली. मयंक अग्रवालने या मॅचआधी खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये 10.50 ची सरासरी आणि 105 च्या स्ट्राईक रेटने फक्त 42 रन केले आहेत. मुंबईविरुद्ध मात्र तो 32 बॉलमध्ये 52 रन करून आऊट झाला, यात 6 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. 162.50 च्या स्ट्राईक रेटने मयंकने बॅटिंग केली. शिखर धवननेही याआधीच्या 4 मॅचमध्ये 31.75 ची सरासरी आणि 129.59 च्या स्ट्राईक रेटने 127 रन केले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात धवननेही अर्धशतक केलं.

अनुज रावत

आरसीबीचा (RCB) ओपनर अनुज रावतने (Anuj Rawat) 5 मॅचमध्ये 25 ची सरासरी आणि 113.63 च्या सरासरीने 125 रन केले. अनुज रावतचं या मोसमातलं एकमेव अर्धशतक मुंबईविरुद्धच आलं आहे. या सामन्यात अनुज रावतने 66 रनची खेळी केली, म्हणजेच अनुज रावतच्या मोसमातल्या अर्ध्यापेक्षा जास्त रन मुंबईविरुद्धच्या मॅचमधूनच आल्या.

व्यंकटेश अय्यर

केकेआरचा (KKR) ओपनर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याचीही या मोसमातली कामगिरी निराशाजनक झाली, पण त्याने मुंबईविरुद्ध अर्धशतक केलं. अय्यरने 5 मॅचमध्ये 24.25 ची सरासरी आणि 112.79 च्या स्ट्राईक रेटने 97 रन केले आहेत. मुंबईविरुद्ध अय्यरने 41 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले. अनुज रावत प्रमाणेच व्यंकटेश अय्यरच्या मोसमातल्या अर्ध्या रन मुंबईविरुद्धच्या मॅचमध्येच झाल्या आहेत.

ललित यादव-अक्षर पटेल

ललित यादव (Lalit Yadav) आणि अक्षर पटेल (Axar Patel) या दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) खेळाडूंनी मुंबईच्या हातात वाटणारा विजय खेचून आणला. ललित यादवने 38 बॉलमध्ये नाबाद 48 आणि अक्षर पटेलने 17 बॉलमध्ये नाबाद 38 रनची खेळी केली. या दोघांचाही या मोसमातला हा सर्वाधिक स्कोअर आहे. ललित यादवने 4 मॅचच्या 3 इनिंगमध्ये 74 रन केले, त्यातले 48 रन मुंबईविरुद्ध आले आहेत. तर अक्षर पटेलने 4 मॅचच्या 3 इनिंगमध्ये 68 रन बनवले आहेत, यातले 38 रन मुंबईविरुद्धच्या मॅचवेळचे आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians