मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सने दिल्लीला (Mumbai Indians vs Delhi Capitals) पराभवाचा धक्का दिला आहे, त्यामुळे आरसीबी (RCB) प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) पोहोचणारी चौथी टीम ठरली आहे, तसंच दिल्लीचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. दिल्लीने दिलेलं 160 रनचं आव्हान मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. मुंबईकडून इशान किशनने (Ishan Kishan) 35 बॉलमध्ये 48 रन केल्या, पण विजयाचा शिल्पकार ठरला तो टीम डेव्हिड (Tim David). त्याने 11 बॉलमध्ये 34 रनची आक्रमक खेळी केली, यात 2 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. याशिवाय डेवाल्ड ब्रेविसनेही 33 बॉलमध्ये 37 रन केले. दिल्लीकडून नॉर्किया आणि शार्दुलला 2-2 विकेट मिळाल्या, तर कुलदीप यादवला 1 विकेट घेण्यात यश आलं.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईने दिल्लीला 159/7 वर रोखलं. दिल्लीने 50 रनवरच त्यांच्या 4 विकेट गमावल्या होत्या, पण ऋषभ पंत आणि रोव्हमन पॉवेलच्या पार्टनरशीपमुळे त्यांना या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. पॉवेलने 43 आणि पंतने 39 रनची खेळी केली. मुंबईकडून बुमराहला 3, रमणदीपला 2 आणि सॅम्सला एक विकेट मिळाली.
मुंबईच्या या विजयासोबतच आयपीएल प्ले-ऑफच्या चारही टीम ठरल्या आहेत. गुजरात, राजस्थान, लखनऊ आणि आरसीबी या चार टीमनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians, RCB