मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : बेबी एबीने दाखवली 'बेडरूम', भिंतीवर या भारतीय दिग्गजांचे Photo

IPL 2022 : बेबी एबीने दाखवली 'बेडरूम', भिंतीवर या भारतीय दिग्गजांचे Photo

Photo-Mumbai Indians

Photo-Mumbai Indians

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही. मुंबईची कामगिरी यंदा निराशाजनक झाली असली तरी दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या सगळ्या 6 सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास अशक्य आहे. मुंबईची कामगिरी यंदा निराशाजनक झाली असली तरी दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. बेबी एबी (Baby AB) नावाने लोकप्रिय झालेल्या डेवाल्डने आयपीएलमध्ये त्याची चुणूक दाखवली आहे.

लखनऊविरुद्धच्या सामन्यात ब्रेविसने 13 बॉलमध्ये 31 रनची अफलातून खेळी केली, यात 6 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. लखनऊविरुद्धच्या मॅचआधी ब्रेविसने पंजाबविरुद्धही धमाका केला होता. ब्रेविसने 25 बॉलमध्ये 49 रन केले, यात त्याने 5 सिक्स आणि 4 फोर ठोकल्या.

18 वर्षांच्या डेवाल्ड ब्रेविसने त्याच्या बेडरूमच्या भिंतीवर असलेले फोटो दाखवले आहेत, यामध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), विराट कोहली (Virat Kohli), एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांचे फोटो आहेत.

'लहानपणापासूनच माझ्याकडे बरेच फोटो आहेत. माझ्या बेडरूमच्या भिंतीवर तुम्हाला एबी डिव्हिलियर्सचे बरेच फोटो दिसतील, याशिवाय विराट कोहली, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग यांचे फोटोही आहेत. या क्रिकेटपटूंना बघूनच मला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. याशिवाय मला भविष्यात काय मिळवायचं आहे, हेदेखील मी लिहायचो,' असं ब्रेविस म्हणाला.

'मी 18 वर्षांचा आहे, अनेकांना माझ्या भिंतीवर हे फोटो अजूनही का आहेत? असं वाटेल, पण जितकं शक्य होईल तितका काळ मी हे फोटो ठेवणार आहे. या फोटोंमागे बऱ्याच आठवणी आणि गोष्टी आहेत,' असं ब्रेविसने सांगितलं. मुंबई इंडियन्सने ब्रेविसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये धमाका

डेवाल्ड ब्रेविसने यावर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये धमाका केला होता. तो स्पर्धेतला सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. 6 मॅचमध्ये त्याने 84 पेक्षा जास्तच्या सरासरीने 506 रन केले होते. 18 वर्षांच्या या खेळाडूने वर्ल्ड कपमध्ये 2 शतकं आणि 3 अर्धशतकं केली. या कामगिरीमुळे अनेक फ्रॅन्चायजीचं लक्ष त्याच्यावर होतं. मुंबईने डेवाल्डला 3 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians