मिळालेल्या माहितीनुसार, मेगा ऑक्शन12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. त्यापूर्वी धोनी चेन्नईत लिलावाची रणनीती तयार करण्यासाठी दाखल झाला आहे. तसेच, धोनी स्वतः लिलावाच्या ठिकाणी उपस्थित असणार आहे. तो याठिकाणी मेगा ऑक्शनच्या तयारीवर चर्चा करेल. असे असले तरी परंतु हा त्याचा वैयक्तिक निर्णय असेल की, त्याला मेगा लिलावासाठी उपस्थित राहायचे आहे की, नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या 2022 च्या आयपीएलसाठी सर्व तयारी करत आहे. 2022 मध्ये पाचव्यांदा आयपीएलच्या विजेतेपदाची ट्रॉफी मिळविण्यासाठी मेगा लिलावापूर्वी संघाने आपल्या चार प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये धोनीच्या नावाचाही समावेश आहे. यावेळी चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाने पहिला खेळाडू रवींद्र जडेजाला 16 कोटींची सर्वाधिक रक्कमेत संघात कायम ठेवले आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला 12 कोटींहून अधिक रक्कम मोजत संघात कायम ठेवले आहे.The goes , every single time! #ThalaDharisanam #WhistlePodu pic.twitter.com/IihZJsuDVQ
— Chennai Super Kings - Mask Pdu Whistle Pdu! (@ChennaiIPL) January 27, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Ipl 2022 auction, MS Dhoni