मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : 'फिट' असूनही सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्समध्ये का नाही? पाहा Inside Story

IPL 2022 : 'फिट' असूनही सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्समध्ये का नाही? पाहा Inside Story

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अजूनही मैदानात उतरला नाही.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अजूनही मैदानात उतरला नाही.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अजूनही मैदानात उतरला नाही.

  • Published by:  Shreyas

नवी मुंबई, 2 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अजूनही मैदानात उतरला नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या सीरिजवेळी सूर्यकुमारच्या बोटाला दुखापत झाली, त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धची सीरिजही खेळू शकला नव्हता. दुखापतीवर उपचार घेण्यासाठी सूर्या बँगलोरच्या एनसीएमध्ये गेला होता.

दिल्लीविरुद्धच्या मॅचआधी सूर्यकुमार यादव मुंबईच्या टीममध्ये आला होता, पण नियमांमुळे तो तीन दिवस क्वारंटाईन होता. मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन झहीर खान (Zaheer Khan) याने मॅचच्या 24 तास आधी सूर्यकुमार यादव फिट असल्याचं सांगितलं, पण तरीही तो राजस्थानविरुद्धच्या (MI vs RR) मॅचमध्ये का खेळला नाही, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली.

सूर्यकुमार यादव राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये का खेळला नाही, याचं कारण समोर आलं आहे. सूर्या अजून फिट झालेला नाही, त्यामुळे त्याने मुंबईच्या सरावामध्येही सहभाग नोंदवला नाही.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईने दिल्लीविरुद्ध खेळलेल्या खेळाडूंनाच संधी दिली आहे. तिलक वर्मा (Tilak Varma) आणि अनमोलप्रीत सिंग (Anmolpreet Singh) या दोन युवा खेळाडूंना सूर्यकुमार यादव फिट नसल्यामुळे संधी मिळत आहे. सूर्या टीममध्ये परत आल्यानंतर यांच्यापैकी एकाला बाहेर बसावं लागणार आहे.

या सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर जॉस बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने 193 रनपर्यंत मजल मारली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातलं हे पहिलंच शतक होतं. बटलरने 68 बॉलमध्ये 100 रनची खेळी केली, यामध्ये 11 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. मुंबईकडून बुमराह आणि टायमल मिल्स यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर कायरन पोलार्डला एक विकेट घेण्यात यश आलं.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, अनमोलप्रित सिंग, टीम डेव्हिड, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, बसिल थम्पी, जसप्रीत बुमराह

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Suryakumar yadav