मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबईविरुद्धच्या मॅचआधी कोहली भडकला, स्टम्प तोडण्यासाठी उगारली बॅट, VIDEO

IPL 2022 : मुंबईविरुद्धच्या मॅचआधी कोहली भडकला, स्टम्प तोडण्यासाठी उगारली बॅट, VIDEO

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शनिवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs RCB) यांच्यात सामना होणार आहे. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी सराव करण्यासाठी मैदानात उतरला.

  • Published by:  Shreyas

पुणे, 9 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शनिवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs RCB) यांच्यात सामना होणार आहे. मुंबईचा प्रयत्न पहिल्या विजयावर आहे, तर आरसीबी विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी इच्छूक असेल. आरसीबीचा मागचा सामना 5 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध झाला, ज्यात आरसीबीला विजय मिळाला होता. विजयाची ही लय कायम ठेवण्यासाठी आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी सराव करण्यासाठी मैदानात उतरला. सराव करत असताना एका स्पिनरने विराटला बोल्ड केलं, यानंतर विराट इतका भडकला की त्याने स्टम्प तोडण्यासाठी बॅट उगारली.

ट्विटरवर एका चाहत्याने विराट कोहलीच्या या कृत्याचा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये सराव करताना दिसत आहे. स्पिन बॉलरच्या आतमध्ये येणाऱ्या बॉलवर लेट कट करण्याच्या नादात विराटचा शॉट चुकला आणि बॉल मिडल स्टम्पला लागला. यानंतर संतापलेल्या विराटने स्टम्पवरच बॅट आपटण्याचा प्रयत्न केला, अखेरच्या क्षणी विराटने स्व:तला रोखलं. सराव करताना आऊट झाल्यामुळे विराट किती नाराज होता, हे या व्हिडिओमधून दिसत आहे.

मुंबईच्या अश्विनसाठी तयारी

विराट कोहली मुंबई इंडियन्सचा लेग स्पिनर मुरुगन अश्विनविरुद्ध (Murugan Ashwin) खेळण्यासाठी सराव करत होता. अश्विनने आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये 4 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने त्याच्या लेग स्पिनने अनेक बॅटरना अडचणीत आणलं, त्यामुळे विराट नेटमध्ये लेग स्पिनरच्या बॉलिंगवर सराव करत होता.

विराटची निराशाजनक कामगिरी

आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. 3 मॅचमध्ये त्याने 58 रन केले आहेत. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध त्याने नाबाद 41 रन केले होते. आरसीबीने या मोसमात 3 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी पाचव्या क्रमांकावर तर मुंबई 9 व्या क्रमांकावर आहे. मोसमाच्या पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB, Virat kohli