मुंबई, 11 एप्रिल : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमात मुंबई इंडियन्सनची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे, टीमने पहिल्या चारही मॅच गमावल्या आहेत. पण सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मुंबईसाठी धमाका केला आहे. सूर्याने खेळलेल्या दोन्ही मॅचमध्ये अर्धशतक केलं. आरसीबीविरुद्धच्या मॅचमध्ये (MI vs RCB) त्याने 37 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले.
आरसीबीविरुद्ध अर्धशतक केल्यानंतर सूर्यकुमार यादवने वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. अर्धशतकानंतर त्याने बॅट वर केली आणि प्रेक्षकांच्या दिशेने पाहून नमस्कार केला. सूर्याच्या या अर्धशतकानंतरही मुंबईचा या सामन्यात पराभव झाला.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून सूर्यकुमारचा नमस्कार करतानाचा फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये सूर्यकुमारचे आई-वडीलही आहेत. 'सेलिब्रेशनचं कारण, कुटुंबासमोर खेळण्यापेक्षा स्पेशल काहीच नाही,' असं कॅप्शन मुंबई इंडियन्सननी या फोटोला दिलं आहे.
सूर्यकुमारने आयपीएलच्या या मोसमात 2 मॅच खेळल्या, यात त्याने 164.38 च्या स्ट्राईक रेटने 120 रन केले आहेत. नाबाद 68 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. 120 च्या सरासरीने सूर्याने बॅटिंग केली आहे.
अंगठ्याच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव मुंबईकडून पहिल्या दोन मॅच खेळू शकला नव्हता. केकेआरविरुद्धच्या मॅचमधून सूर्याचं टीममध्ये पुनरागमन झालं. आरसीबीविरुद्ध सूर्यकुमारची बॅटिंग बघण्यासाठी त्याचे वडील अशोक कुमार यादव आणि आई स्वप्ना यादव पुण्याच्या स्टेडियममध्ये आले होते. आपल्या आई-वडिलांना सूर्याने निराश केलं नाही. त्याच्या या धमाकेदार खेळीमुळे मुंबईला 150 रनपर्यंत मजल मारता आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB, Suryakumar yadav