मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : सूर्याच्या अर्धशतकाने वाचवली मुंबईची लाज, बॅटिंगने पुन्हा केली निराशा

IPL 2022 : सूर्याच्या अर्धशतकाने वाचवली मुंबईची लाज, बॅटिंगने पुन्हा केली निराशा

Photo-Mumbai Indians

Photo-Mumbai Indians

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबईची (MI vs RCB) अवस्था 13.2 ओव्हरमध्ये 79/6 अशी झाली होती, पण सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अफलातून अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 151/6 पर्यंत मजल मारली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

पुणे, 9 एप्रिल : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबईची (MI vs RCB) अवस्था 13.2 ओव्हरमध्ये 79/6 अशी झाली होती, पण सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अफलातून अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 151/6 पर्यंत मजल मारली. सूर्याने 37 बॉलमध्ये 68 रनची नाबाद खेळी केली, यामध्ये 5 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. जयदेव उनाडकटनेही (Jaydev Unadkat) सूर्याला चांगली साथ दिली. सूर्या आणि जयदेव यांच्यात 41 बॉलमध्ये नाबाद 72 रनची पार्टनरशीप झाली.

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर बॅटिंगला आलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशनने (Ishan Kishan) मुंबईला चांगली सुरूवात करून दिली.

रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यात 6.2 ओव्हरमध्ये 50 रनची पार्टनरशीप झाली. हर्षल पटेलने रोहितला 26 रनवर आऊट केलं, यानंतर डेवाल्ड ब्रेविस 8 रनवर हसरंगाच्या बॉलिंगवर एलबीडब्ल्यू झाला. आकाश दीपने इशान किशनला 26 रनवर माघारी पाठवलं, यानंतर तिलक वर्माला ग्लेन मॅक्सवेलने शून्य रनवर रन आऊट केलं. हसरंगाने कायरन पोलार्डलाही पहिल्याच बॉलला एलबीडब्ल्यू केलं.

आयपीएलच्या या मोसमात मुंबईला अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या तीन पैकी तिन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB, Suryakumar yadav