मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या 'त्या' अजब निर्णायाचं रोहित शर्मानं सांगितलं कारण

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या 'त्या' अजब निर्णायाचं रोहित शर्मानं सांगितलं कारण

आरसीबी विरूद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या एका निर्णयावर आश्चर्य व्यक्क केलं जात होतं. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्या निर्णायाचं कारण सांगितलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 एप्रिल : मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील सलग चौथा पराभव सहन करावा लागला आहे. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबईचा 7 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये मुंबईनं दिलेलं 152 रनचं आव्हान आरसीबीनं 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. ही मॅच सुरू झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या एका निर्णयावर आश्चर्य व्यक्क केलं जात होतं. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्या निर्णायाचं कारण सांगितलं आहे.

आरसीबीच्या सामन्यात मुंबईनं टीममध्ये दोन बदल केले होते. टायमल मिल्सऐवजी (Tymal Mills) जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) आणि डॅनियल सॅम्सऐवजी (Daniel Sams) रमणदीपला (Raman Deep) संधी देण्यात आली आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच मुंबई फक्त 2 परदेशी खेळाडूंसह खेळली. आरसीबी विरूद्धच्या पराभवानंतर रोहितनं या निर्णयाचं कारण सांगितलं.

रोहित म्हणाला की, 'आम्हाला वाटलं की या पिचवर दोन विदेशी खेळाडूंसह खेळणे योग्य असेल. आम्हाला आमची बॅटींग भक्कम करायची होती. दुर्दैवानं काही विदेशी खेळाडू उपलब्ध नव्हते.त्यामुळे आमच्याकडील उपलब्ध पर्यांमधील सर्वोत्तम आम्ही निवडले.'

रोहितनं यावेळा बोलताना बॅटींगमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज व्यक्क केली. 'आमच्या बॅटींगमध्ये सुधारणा करण्याची मोठी आवश्यकता आहे. आम्ही चांगले रन केले तर बॉलर्सना काही करण्याची संधी मिळेल. मागील दोन मॅचमध्ये आम्ही ते करू शकलो नाही. मागच्या मॅचमध्ये आम्ही 160 रन केले. या मॅचमध्ये 150 केले. या प्रकरारच्या पिचवर हे रन पुरेसे नाहीत. मी नेहमीच बॅट आणि बॉलनं सामुहीक कामगिरी करण्याची गरज व्यक्त केली आहे. ती गोष्ट सध्या होत नाही.' असंही त्यानं मान्य केलं.

IPL 2022 : रोहित शर्मानं स्वीकारली पराभवाची जबाबदारी! म्हणाला, मी...

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबईची 13. 2 ओव्हर्समध्ये 6 आऊट 79 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकामुळे मुंबईनं 6 आऊट 151 पर्यंत मजल मारली. आरसीबीनं 19 व्या ओव्हर्समध्ये 152 रनचं टार्गेट पूर्ण करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB, Rohit sharma