मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबईची हाराकिरी सुरूच, आता RCB ने दिला धक्का

IPL 2022 : मुंबईची हाराकिरी सुरूच, आता RCB ने दिला धक्का

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) हाराकिरी सुरूच आहे. दिल्ली, राजस्थान, केकेआरनंतर आता आरसीबीनेही मुंबईला (RCB vs MI) पराभवाचा धक्का दिला आहे.

  • Published by:  Shreyas

पुणे, 9 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) हाराकिरी सुरूच आहे. दिल्ली, राजस्थान, केकेआरनंतर आता आरसीबीनेही मुंबईला (RCB vs MI) पराभवाचा धक्का दिला आहे. पहिल्या तिन्ही मॅचप्रमाणेच मुंबईची बॉलिंग पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. मुंबईने दिलेल्या 152 रनच्या आव्हानाचा पाठलाग आरसीबीने 3 विकेट गमावून केला. अनुज रावतने 47 बॉलमध्ये 66 रनची खेळी केली, यात 2 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. तर विराट कोहलीने 36 बॉलमध्ये 48 रन केले. ग्लेन मॅक्सवेलने लागोपाठ 2 बॉलला 2 फोर मारून आरसीबीला विजय मिळवून दिला.

मुंबईकडून जयदेव उनाडकट आणि डेवाल्ड ब्रेविसला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली, तर अनुज रावतला रमणदीप सिंगने रन आऊट केलं. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.

मुंबईची (MI vs RCB) अवस्था 13.2 ओव्हरमध्ये 79/6 अशी झाली होती, पण सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अफलातून अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 151/6 पर्यंत मजल मारली. सूर्याने 37 बॉलमध्ये 68 रनची नाबाद खेळी केली, यामध्ये 5 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. जयदेव उनाडकटनेही (Jaydev Unadkat) सूर्याला चांगली साथ दिली. सूर्या आणि जयदेव यांच्यात 41 बॉलमध्ये नाबाद 72 रनची पार्टनरशीप झाली.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशनने (Ishan Kishan) मुंबईला चांगली सुरूवात करून दिली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यात 6.2 ओव्हरमध्ये 50 रनची पार्टनरशीप झाली. हर्षल पटेलने रोहितला 26 रनवर आऊट केलं, यानंतर डेवाल्ड ब्रेविस 8 रनवर हसरंगाच्या बॉलिंगवर एलबीडब्ल्यू झाला. आकाश दीपने इशान किशनला 26 रनवर माघारी पाठवलं, यानंतर तिलक वर्माला ग्लेन मॅक्सवेलने शून्य रनवर रन आऊट केलं. हसरंगाने कायरन पोलार्डलाही पहिल्याच बॉलला एलबीडब्ल्यू केलं.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB