मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मैदानात घुसून विराटला ठोसा मारणाऱ्याला अटक, आरोपी साताऱ्याचा रहिवासी

IPL 2022 : मैदानात घुसून विराटला ठोसा मारणाऱ्याला अटक, आरोपी साताऱ्याचा रहिवासी

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शनिवारी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी (MI vs RCB) यांच्यात पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये मॅच झाली. या सामन्यात सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली, कारण एक व्यक्ती मैदानात घुसली आणि त्याने विराट कोहलीला (Virat Kohli) ठोसा मारला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

पुणे, 11 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शनिवारी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी (MI vs RCB) यांच्यात पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये मॅच झाली. या सामन्यात सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली, कारण एक व्यक्ती मैदानात घुसली आणि त्याने विराट कोहलीला (Virat Kohli) ठोसा मारला, तसंच तो रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जवळही जात होता. याप्रकरणी पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.

26 वर्षांच्या या आरोपीचं नाव दशरथ जाधव आहे, तसंच तो महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात राहणारा आहे. पुण्याच्या स्टेडियमची सुरक्षा भेदून दशरथ मैदानात उतरला आणि त्याने विराटला ठोसा मारला, यानंतर तो रोहितच्या जवळही जात होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितलं की दशरथ जाधववर आयपीसीचे कलम 447 आणि कलम 353 लावण्यात आली आहेत. पोलिसांसोबत वाद घालण्याचा आरोपही त्याच्यावर लावण्यात आला आहे.

आयपीएल 2022 च्या 18व्या मॅचमध्ये आरसीबीने मुंबईचा पराभव केला. या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला पहिले बॅटिंगला बोलावलं, यानंतर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 151 रन केले. या आव्हानाचा पाठलाग आरसीबीने 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून केला. आरसीबीचा ओपनर अनुज रावतने 47 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 66 रन केले. तर विराटने 36 बॉलमध्ये 5 फोर मारत 48 रनची खेळी केली.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB