मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मॅक्सवेलचा जॉन्टी स्टाईल रनआऊट, मुंबईचा नवा सुपरस्टार शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये, VIDEO

IPL 2022 : मॅक्सवेलचा जॉन्टी स्टाईल रनआऊट, मुंबईचा नवा सुपरस्टार शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये, VIDEO

Photo- IPL/BCCI

Photo- IPL/BCCI

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. पहिल्या तीन मॅच गमावल्यानंतर आरसीबीविरुद्धच्या मॅचमध्येही मुंबईची (MI vs RCB) बॅटिंग गडगडली आहे.

  • Published by:  Shreyas

पुणे, 9 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. पहिल्या तीन मॅच गमावल्यानंतर आरसीबीविरुद्धच्या मॅचमध्येही मुंबईची (MI vs RCB) बॅटिंग गडगडली आहे. 10 ओव्हरमध्ये 62 रनवरच मुंबईच्या 5 विकेट गेल्या आहेत. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर बॅटिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबईला चांगली सुरूवात करून दिली.

रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यात 6.2 ओव्हरमध्ये 50 रनची पार्टनरशीप झाली. हर्षल पटेलने रोहितला 26 रनवर आऊट केलं, यानंतर डेवाल्ड ब्रेविस 8 रनवर हसरंगाच्या बॉलिंगवर एलबीडब्ल्यू झाला. आकाश दीपने इशान किशनला 26 रनवर माघारी पाठवलं. मॅचचा टर्निंग पॉईंट आला तो ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या धमाकेदार रन आऊटमुळे.

आकाश दीपच्या बॉलिंगवर तिलक वर्माने (Tilak Varma) शॉर्ट लॉन्ग ऑनच्या दिशेने बॉल मारला, यानंतर तो नसलेली रन धावायला गेला, पण मॅक्सेवलने (Glenn Maxwell Run Out) त्याला रन आऊट केलं. मॅक्सवेलचा हा रनआऊट बघून अनेकांना दक्षिण आफ्रिकेचा महान फिल्डर जॉन्टी ऱ्होड्सची आठवण झाली. ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या या मोसमातली पहिलीच मॅच खेळत आहे.

तिलक वर्माची विकेट गेल्यानंतर पुढच्याच ओव्हरला कायरन पोलार्ड पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. वानिंदु हसरंगाने पोलार्डला एलबीडब्ल्यू केलं.

First published:

Tags: Glenn maxwell, Ipl 2022, Mumbai Indians, RCB