मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच, मुंबईवर ओढावली मोठी नामुष्की, रोहितला करावी लागली ती घोषणा!

IPL 2022 : आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच, मुंबईवर ओढावली मोठी नामुष्की, रोहितला करावी लागली ती घोषणा!

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमात तीन मॅच खेळल्यानंतरही मुंबईला एकही विजय मिळालेला नाही.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमात तीन मॅच खेळल्यानंतरही मुंबईला एकही विजय मिळालेला नाही. दिल्ली, राजस्थान यांच्यानंतर केकेआरने मुंबईला पराभवाचा धक्का दिला, यानंतर आता मुंबईचा चौथा सामना आरसीबीविरुद्ध (MI vs RCB) होत आहे. या सामन्यात मुंबईने टीममध्ये दोन बदल केले आहेत.

टायमल मिल्सऐवजी (Tymal Mills) जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) आणि डॅनियल सॅम्सऐवजी (Daniel Sams) रमणदीपला (Raman Deep) संधी देण्यात आली आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच मुंबई फक्त 2 परदेशी खेळाडूंना घेऊन मैदानात उतरत आहे. आयपीएलच्या 15 मोसमांमध्ये फक्त तिसऱ्यांदाच टीम दोन परदेशी खेळाडू घेऊन उतरत आहेत. याआधी याच मोसमात दिल्लीने मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये टीम सायफर्ट आणि रोव्हमन पॉवेल हे 2 परदेशी खेळाडू खेळवले होते. दिल्लीच्या टीममध्ये परदेशी खेळाडू दाखल न झाल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यायला लागला होता. त्याआधी 2011 साली केकेआरने सीएसकेविरुद्ध जॅक कॅलिस आणि इयन मॉर्गन या दोघांनाच खेळवलं होतं.

पहिल्या तिन्ही सामन्यांमधल्या खराब कामगिरीनंतर डॅनियल सॅम्सला बाहेर बसवलं जाईल हे निश्चित मानलं जात होतं, कारण सॅम्स मुंबईच्या तिन्ही पराभवांमधला व्हिलन ठरला होता. सॅम्सने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात 3 ओव्हरमध्ये 28 रनची गरज असताना एकाच ओव्हरमध्ये 24 रन दिल्या. यानंतर राजस्थानविरुद्ध युझवेंद्र चहलची शेवटची ओव्हर शिल्लक असताना सॅम्सने चुकीचा शॉट मारला, ज्यात तो विकेट गमावून बसला. बॅटिंगला आल्यानंतर पहिल्याच बॉलला सॅम्सने असा शॉट मारल्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात आली.

केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये तर पॅट कमिन्सने सॅम्सच्या एका ओव्हरला 35 रन ठोकले. या ओव्हरमध्ये सॅम्सने 4 सिक्स आणि 2 फोर दिल्या, याचसोबत एका नो बॉलवर केकेआरने 3 रन काढल्या.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रमणदीप, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, बसिल थम्पी, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB