मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 MI vs RCB : मुंबई अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत, आरसीबीने टॉस जिंकला

IPL 2022 MI vs RCB : मुंबई अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत, आरसीबीने टॉस जिंकला

आयपीएलच्या या मोसमातल्या (IPL 2022) पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs RCB) मैदानात उतरत आहे. मुंबईचा हा सामना आरसीबीविरुद्ध होत आहे.

  • Published by:  Shreyas

पुणे, 9 मार्च : आयपीएलच्या या मोसमातल्या (IPL 2022) पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs RCB) मैदानात उतरत आहे. मुंबईचा हा सामना आरसीबीविरुद्ध होत आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात आरसीबीने टीममध्ये एक बदल केला आहे. शरफेन रदरफोर्डऐवजी ग्लेन मॅक्सवेलला संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईने त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले आहेत. टायमल मिल्सऐवजी जयदेव उनाडकटला तर डॅनियल सॅम्सऐवजी रमणदीपला संधी देण्यात आली आहे. मुंबईने टीममध्ये फक्त 2 परदेशी खेळाडूंनाच संधी दिली आहे.

आयपीएलच्या या मोसमात मुंबईचा दिल्ली, राजस्थान आणि केकेआरविरुद्ध पराभव झाला आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबई विजयाच्या जवळ होती, पण मोक्याच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे तिन्हीवेळा मुंबईला धक्का बसला. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम नवव्या तर आरसीबी पाचव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 3 पैकी 2 मॅच जिंकल्या असून एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

LIVE Score पाहण्यासाठी क्लिक करा

मुंबईची टीम

रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रमणदीप, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, बसिल थम्पी, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह

आरसीबीची टीम

फाफ डुप्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, डेव्हिड विली, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB