मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : 7 ओव्हरमध्येच मुंबईने गमावली मॅच, रोहितच्या टीमचा पराभवाचा 'सिक्सर'

IPL 2022 : 7 ओव्हरमध्येच मुंबईने गमावली मॅच, रोहितच्या टीमचा पराभवाचा 'सिक्सर'

Photo-Mumbai Indians

Photo-Mumbai Indians

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) सलग सहावा पराभव झाला आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने दिलेल्या 200 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हरमध्ये 181/9 पर्यंतच मजल मारता आली.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) सलग सहावा पराभव झाला आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने दिलेल्या 200 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हरमध्ये 181/9 पर्यंतच मजल मारता आली, त्यामुळे लखनऊचा 18 रननी विजय झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) पुन्हा एकदा अपयशी ठरले. रोहित 6 रनवर तर इशान किशन 13 रनवर आऊट झाला. डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) पुन्हा एकदा त्याच्या बॅटिंगची चुणूक दाखवली, पण त्याला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. 13 बॉलमध्ये 31 रन करून ब्रेविस आऊट झाला. 238.46 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केलेल्या ब्रेविसने 6 फोर आणि 1 सिक्स मारली. लखनऊकडून आवेश खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर होल्डर, चमीरा, बिष्णोई आणि स्टॉयनिस यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर केएल राहुलच्या (KL Rahul) शतकाच्या मदतीने लखनऊने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 199 रन केले. राहुलने 60 बॉलमध्ये नाबाद 103 रन केले, यात 9 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. मुंबईकडून जयदेव उनाडकटला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर मुरुगन अश्विन आणि फॅबियन एलन यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

लखनऊविरुद्धच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या रणनितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर रोहितने पार्ट टाईम ऑफ स्पिनर तिलक वर्माला पहिली ओव्हर दिली, तर लेग स्पिनर मुरुगन अश्विन दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आला. पॉवर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये मुंबईने 6 बॉलर वापरले.

मुंबईचा हुकमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह चौथी ओव्हर टाकण्यासाठी आला. विकेट मिळून देणारा बॉलर असूनही बुमराहला सुरूवातीलाच बॉलिंग देण्यात आली नाही, हे समजण्यापलीकडे आहे, अशी टीका कॉमेंट्री करणाऱ्या सुनिल गावसकर यांनी केली.

7 ओव्हरमध्येच गमावली मॅच

मुंबई इंडियन्सने या सामन्यात बसिल थम्पीला (Basil Thampi) बाहेर करून फॅबियन एलनला (Fabian Allen) संधी दिली, यानंतर एलनने पहिल्याच ओव्हरला क्विंटन डिकॉकला एलबीडब्ल्यू केलं, पण यानंतर मात्र लखनऊच्या बॅटिंगने त्याच्यावर आक्रमण केलं. एलनने 4 ओव्हरमध्ये 11.50 च्या इकोनॉमी रेटने 46 रन दिले, तर टायमल मिल्सच्या (Tymal Mills) 3 ओव्हरमध्ये तब्बल 54 रन आल्या. म्हणजेच फॅबियन एलन आणि मिल्स यांच्या 7 ओव्हरमध्येच तब्बल 100 रन आले, ज्याचा फटका मुंबईला बसला.

पराभवाचा सिक्सर

मुंबई इंडियन्सचा या मोसमातला हा लागोपाठ सहावा पराभव आहे. यावर्षी अजूनही मुंबईला एकही मॅच जिंकता आलेली नाही. या पराभवासोबतच मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास अशक्य झालं आहे. आता उरलेल्या 8 सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला तरीही त्यांच्या खात्यात 16 पॉईंट्स होतील. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Lucknow Super Giants, Mumbai Indians